Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी ट्विट करत ठाणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. पोलिसांनी सुडाचे राजकारण बंद करावे. राजकारणाचा पट कधीही बदलतो, असे म्हणत त्यांनी ठाणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून आव्हाड यांचे ठाणे पोलिसांसोबत खटके उडत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Ekanath Shinde ) देखील निशाणा साधला आहे.
आव्हाड यांनी ट्विट करत आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि ज्यांच्यावर खुनाचा आरोप ते मात्र बाहेर फिरत आहेत, असे आव्हाड म्हणाले आहेत. ठाणे पोलीसांनी सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण बंद करावं. राजकीय प्यादा सारखे वागू नये. राजकारणाचा पट कधिही बदलतो, असे म्हणत त्यांनी पोलिसांना इशारा दिला आहे. तसेच ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री नाही आहेत, ठाण्यात मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
Sanjay Kakade : फक्त १०० फोन आणि मी लोकसभा जिंकणार, काकडेंनी सांगितला जिकंण्याचा प्लॅन
आज अभिजीत पवार,हेमंत वाणी,विक्रम खामकरआणि माझ्या अनेक सहकाऱ्यांना 110 अन्वये नोटीस देण्यात आली. दुसरीकडे मात्र 5-5 खून केलेली माणसं ही बिनधास्त उघडपणाने फिरत आहेत, अशा शब्दाता आव्हाडांनी टीका केली आहे.
ठाणे पोलीसांनी सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण बंद करावं. राजकीय प्यादा सारखे वागू नये. राजकारणाचा पट कधिही बदलतो. आज अभिजीत पवार, हेमंत वाणी आणि माझ्या अनेक सहका-यांना 110 अन्वये नोटीस देण्यात आली. pic.twitter.com/FP6H0V5zYC
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2023
..तर चंद्रकांत पाटलांना पुणे सोडावं लागेल…
दरम्यान काही दिवसांपूर्वी आव्हाड यांच्या मुलीला व जावयाला मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावरुन आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. तसेच ठाणे महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर गँगस्टर उभा असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरुन आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका सहआयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली होती. त्यानंतर आव्हाड व त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.