Download App

‘हिरे बाजार सूरतला नेण्याचा डाव फसला, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच…’, आव्हाडांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Jitendra awhad : काही दिवसांपूर्वी सुरतमधील भव्य हिरे (Surat Diamond Bourse) बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते झालं. सुरतमधील हिरे बाजार हा मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. मात्र, किरण जेम्स कंपनीने या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी मुंबईतून पुन्हा आपला कामकाज सुरू करणार आहे. दरम्यान, यावरून आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra awhad) यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. मुंबईवरील सूड उगवण्यासाठी येथील प्रस्थापित हिरे बाजार सुरतला नेण्याचा आखलेला डाव फसलाय, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच, अशी खोचक टीका आव्हाडांनी केली.

Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला पाच अपेक्षा; सर्वांच्या नजरा खिळल्या… 

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं की, देशाच्या प्रगतीसाठी अर्थकारण गरजेचं असतं. उद्योगधंद्यांची वाताहत, वाढती बेरोजगारी आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढती दरी पाहता विद्यमान सरकारला त्यातलं किती कळतं, हा प्रश्नच आहेत. कोणत्याही शहराला आर्थिक केंद्र प्रस्थापित करण्यासाठी इतिहास, भौगोलिक पार्श्वभूमी आणि सामाजिक परिस्थिती महत्त्वाची असते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि जगाच्या नकाशावर दिमाखात मिरवण्यामागे भौगोलिक स्थाने, लोकांचे परिश्रम आणि इथलं व्यावसायभिमूख वातावरण कारणीभूत आहेत. त्याचं महत्व फक्त भव्यदिव्य इमारती बांधून कमी करता येणार नाही, असं म्हटलं.

Assembly Elections : शेवगाव-पाथर्डीत भाजप विजयी हॅट्रिक करणार की राष्ट्रवादीची वेळ येणार? 

आव्हड़ांनी पुढं लिहिलं की, मुंबईवरील सूड उगवण्यासाठी येथील प्रस्थापित हिरे बाजार सुरतला नेण्याचा आखलेला डाव कसा फसलाय याच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रात झळकतायत. किरण जेम्स या हिरे बाजारातील सर्वात मोठ्या कंपनीने आता पुन्हा एकदा आपली पसंती मुंबईला दिली असून आपला संपूर्ण व्यवसाय मुंबईतूनच करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतं. सूरत डायमंड बोर्समध्ये गेलेल्या सर्व कंपन्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल, याची आम्हाला कल्पना आहे. मुंबईने नेहमीच व्यापाऱ्यांचा आदर केला आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा मुंबईतील सर्व हिरे व्यापाऱ्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.

आव्हाडांनी लिहिलं की, मराठीत एक म्हण आहे “सरड्याची धाव कुंपणापर्यंतच…” कुणी कितीही आदळाआपट करा… मुंबईची सर भारतातील कुठल्याही शहराला येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे, अशी टीका त्यांनी केली.

follow us