Download App

Jitendra Awhad : दाऊदची माणसे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये चहा पितात

  • Written By: Last Updated:

राष्ट्रावादी काँग्रेसचे  ( NCP ) नेते व आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad)  यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर गँगस्टर दिसतात. तसेच दाऊदची माणसे ही महापालिकेत अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसलेली दिसतात, असा आरोप त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांची मुलगी व जावई यांना मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना या बाबतचे आरोप केले आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर गँगस्टर उभा असलेला दिसतो. तसेच दाऊदची माणसे ही ठाणे महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या केबिनमध्य बसलेली असतात. केबिनमध्ये चहा पितात, गप्पा मारतात, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे. या लोकांना आमंत्रिते केले जाते, असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच यावेळी त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर नाव न घेता आरोप केले आहे. एक माणुस म्हणतो मी दिवसाचे 40 लाख कमावतो, दिवसाला 20 लाख वाटतो. त्याला चौकशीसाठी देखील बोलावले आहे. तो बिंधास्तपणे म्हणतो मी फिल्डींग लावली आहे. तरी त्याच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांची मुलगी व जावयाला जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावरुन आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर या अधिकाऱ्याला मारहाण देखील केली होती. या प्रकरणात आव्हाड यांना जामीन मंजूर झाल आहे. आव्हाडांच्या मुलीने देखील पोलिस आमची तक्रार नोंदवून घेत नाहीत, असा आरोप केला आहे.

Tags

follow us