Jitendra Awhad on Eknath Shinde felicitation by Sharad Pawar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे. त्यानंतर शिंदेंची शिवसेना त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत. त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे. त्यावर मी सविस्तर पोस्ट केली आहे. मात्र ठाकरेंच्या पक्षाने शिंदेंचा सत्कार केला म्हणून पवारांवर टीका करणं योग्य नाही. पवार नेहमीच विरोधकांशी चांगले संबंध ठेवतात. तसेच त्यांची राजकीय सामाजिक उंची जास्त असल्याने त्यांना पुरस्कार देण्यासाठी बोलवलं जात. पवारांनी केवळ शिंदेंचा सत्कार केला आहे. त्यांच्याशी हात मिळवणी केलेली नाही.
सारखीच बडबड…राऊतांना काउंसलिंगची गरज, शिवसेना नेत्या शायना एनसींचा हल्लाबोल
त्याचबरोबर शरद पवार यांना सर्वात जास्त धोका अजित पवारांना दिला आहे. मात्र ते त्यांच्या देखील व्यासपीठावर जातात. त्यांच्या भेटी घेतात. त्यांच्या या वागण्याचं आम्हाला देखील कधी कधी वाईट वाटतं. राग येतो पण आपल्या वैयक्तिक वादांमुळे शरद पवार कधीही संवाद बंद करत नाहीत. विरोधकांशी देखील सुसंवाद ठेवणे हा शरद पवारांच्या राजकारणाचा पॅटर्न आहे. असंही ते म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते. या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, आज एकनाथ शिंदे यांचा सन्मान होत आहे.
पवारांशी आघाडी करताना विचार करायला हवा होता, आता पक्ष…; माजी आमदाराचा ठाकरेंना घरचा आहेर</a>
ते सांगतात की, आम्ही सर्व सातारच्या आहोत. शिंदे जेव्हा ठाणे महानगरपालिकेमध्ये सभापती होते. तेव्हा त्यांनी ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ते सातारचे आहेत. सातारने अनेक मुख्यमंत्री दिले मुंबई राज्याच्या मुख्यमंत्री देखील साताऱ्याचे होते. अशी स्तुतीस्तुमनं शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर उधळल्याचं पाहायला मिळालं.