Jitendra Awhad on Maharashtra Bhushan Award Cecemony : काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर ताशेरे ओढले. संताचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जोडण्याचा हा कार्यक्रम होता, अशा शब्दात आव्हाडांनी टीका केली.
आव्हाड म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला. त्या आनंदाचा राजकीय फायदा उठवण्याचे सरकारने ठरवले होते. आता उष्माघाताने ज्या भाविकांचा मृत्यू झाला, त्याची जबाबदारी कोणी घ्यायची हे त्यांचं त्यांनी ठरवावं. पण, जेव्हा सरकार एखादा कार्यक्रम आयोजित करतं, तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार करून कार्यक्रम आयोजित करणं गरजेचं होतं. हा सरकारचा कार्यक्रम होता. हा व्यक्तीगत धर्माधिकारी यांच्या घरचा कार्यक्रम नव्हता. हा कार्यक्रम आयोजित करून, धर्माधिकारी यांचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जुळवण्याचा हा प्रयत्न होता, असा आरोप आव्हाड यांनी केला.
ते म्हणाले की, आयोजनकर्त्यांना हे कसं कळलं नाही की, सुर्य मध्यावर असतांना कार्यक्रम घ्यायचा नसतो, हे साधं गणित आहे. तापमान हे 40 अंशाच्या वर असतांना सरकार सांगत असतं की, तुम्ही काम नसेल तर घराबाहेर पडू नका. मग एवढं तापमान असतांना तरी हा कार्यक्रमाचा घेण्याचा अट्टाहास का केला? तुम्हाला हा कार्यक्रम राजभवनामध्ये घेता आला असता. किंवा संध्याकाळी देखील घेतला आला असं असता, असं आव्हाड म्हणाले.
Sujay Vikhe Vs Prajakt Tanpure : तनपुरेंनी नगर बाजार समितीत लक्ष घालताच विखेंचा राहुरीत धुरळा
त्यांनी सांगिलतं की, जिथं हा कार्यक्रम झाला, तिथं पाण्याची व्यवस्था नव्हती. डोक्यावर छत नव्हतं. त्यामुळं मुंबईच्या वातावरमआत आद्रता असल्यामुळं डिहायड्रेशनचे प्रकार घडले. पण,स्वत: सगळे नेते व्यासपीठावर एसीच्या बाजूला, छताखाली बसले होते. आणि भाविक रणरणत्या उन्हात बसले होते. हे कृत्य अमानवीय आहे. यात माणूसकीचं दर्शनच नाही. सामान्य लोकांना जीव नसतो का? असा सवाल त्यांनी केला. धर्माधिकारी हे माणूसकीचा चेहरा आहेत. हे त्यांनाही आवडलं नसेल. त्यांच्या शिकवणीतून तुम्हीच काहीच शिकला नसाल, तर दुर्देवं आहे.
सगळे भाविक, अनुयायी प्रचंड संतप्त झाले. आम्हाला यावरून राजकारण करायची नाही. पण कार्यक्रम करतांना जराशी विवेकबुध्दी जागी ठेवायला हवी होती. तुम्ही दुपारी सभा ठेवता, आणि लोकांचे बळी जातात, याची कुणीतरी जबाबदारी घ्यावीच पाहिजे. यापासून दूर जाता येणार नाही, असं आव्हाड म्हणाले.
दरम्यान, सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. यावर बोलतांना आव्हाड म्हणाले, हे सगळे भाविक सरकारचा कार्यक्रम होते, म्हणून या सोहळ्याला आहे. ही त्यांनी स्वत:हून केलेली चूक नाही. जेव्हा घरातील एखाद्या सदस्याचं निधनं होतं, तेव्हा अख्खं घर कोसळतं. त्यामुळं सरकारने त्यांना 1 कोटी रुपये द्यावे, असं आव्हाड म्हणाले.