Download App

Rs 2,000 Notes : ‘म्हणजे इतिहासाची संपूर्ण पुनरावृत्ती होईल!’ नोटबंदीच्या निर्णयावरून आव्हाडांची खोचक टीका

2000 rupee note : केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 ची नोट (2000 rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी रिजर्व्ह बँकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर भाजप नेत्यांकडून या निर्णयाचं समर्थन आणि स्वागत केलं जातं. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून खोचक टीका केली आहे.

आरबीआयच्या दोन हजार रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत भाष्य केलं. त्यांनी लिहिलं की, टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत. साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी म्हणजे इतिहासाची कम्लिट पुनरावृत्ती होऊन जाईल, अशा आशयाचं ट्विट करून आव्हाडांनी मोदींवर निशाणा साधला. मोहमंद तुघलक असं कॅप्शनही त्यांनी दिलं.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील एक महत्त्वाची घोषणा १९ मे रोजी आरबीआयकडून करण्यात आली. त्यामुळे ज्या लोकांकडे 2000 च्या नोटा आहेत त्यांनी ताबडतोब बँकेत जाऊन त्या बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआयने केलं आहे. नागरिक 30 सप्टेंबरपर्यंत बँकेतून 2000 च्या नोटा बदलून घेऊ शकतात.

मराठी समाजाचा आधार हरपला; विश्व मराठी संघटनेचे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचे निधन

आरबीआयने सांगितले की, 2000 रुपयांची नोट कोणत्याही बँकेत बदलता येते. म्हणजेच, जर तुमचे खाते स्टेट ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) तुमच्या घराजवळ असेल, तर तुम्ही PNB मध्ये जाऊन 2000 रुपयांची नोट बदलून घेऊ शकता. दुसऱ्या शब्दांत, नोटा बदलण्यासाठी विशिष्ट बँकेत जाण्याची गरज नाही. कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही तुमच्याकडे असलेल्या दोन हजाराच्या नोट बदलवू शकता.

दरम्यान, या निर्णयावर बोलतांना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय अतिशय बालिश असल्याची टीका केली होती. तर राज ठाकरे यांनी असले निर्णय देशाला आणि अर्थव्यवस्थेला परवडणारे नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Tags

follow us