ब्रेकिंग! ठाणे, जालना लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर; कल्याण-डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी राखीव…

राज्यातील महापालिकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येत असून कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर पदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडत जाहीर झालीयं.

Untitle (9)

Untitle (9)

Mayar Reservation : राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. 29 महापालिकांपैकी कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आलीयं. या महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि मनसेच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर होणार असल्याचं बोललं जात होतं. आता अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बसणार हे पाहणं महत्वाचं ठरेल..

तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण सोडतील सुरुवात झाली असून ठाणे (पुरुष), जालना आणि लातूर महापालिकेत महापौर पदाचं आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सोडत निघाली असून या महापालिकांमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर होणार आहे. त्यापैकी जालना आणि लातूर महापालिकेत महिलांंसाठी आरक्षण असणार आहे. तर आरक्षण सोडतीच्या सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्यातील एकूण 15 महापालिकांमध्ये महिलाराज असणार आहे.

पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर , जळगाव, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील महापौर असणार आहे. जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला या चार महापालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गातील महिला महापौरपदी बसणार आहे.

Exit mobile version