Download App

Kedar Dighe :धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाचे गलिच्छ राजकारण; त्यांचं नाव घेऊन म्हस्केंनी आपला TRP वाढवणं बंद करावं

  • Written By: Last Updated:

Kedar Dighe on Naresh Mhaske : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे विचार व कृती पुढे नेणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी केला. (Kedar Dighe said The dirty politics of Dharmaveer Anand Dighe’s name; Mhaske should stop increasing his TRP by taking his name)

पत्रकार परिषदेत बोलतांना केदार दिघे म्हणाले, गेल्या अकरा महिन्यांपासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने गलिच्छ राजकारण सुरू आहे. नरेश म्हस्के हे दिघे साहेबांचे नाव घेऊन खोटंनाटं बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या पद्धतीने म्हस्के हे आनंद दिघे यांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी करत आहेत ते पाहता त्यांची किव येऊ लागली. धर्मवीरांचे नाव घेऊन म्हस्के स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांनी दिघे साहेबांचे नाव घेऊन स्वतःचा TRP वाढवण्याचे धंदे बंद करावे, अशा शब्दात केदार दिघे यांनी सुनावलं.

पायलटांच्या खेळीने काँग्रेसमध्ये खळबळ! गेहलोतांना बळ देण्यासाठी केला ‘हा’ प्लॅन 

आनंद दिघे यांचा अपघात नव्हे तर खून झाल्याचा संशय आहे, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही शिरसाट यांनी केली. दरम्यान, यावरही केदार शिंदे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांच्या पार्थिवाला मी त्यांचा पुतण्या म्हणून अग्नी दिला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी समोर यावे आणि मला द्यावे. आनंद दिघे यांचा पुतण्या असल्याने मी यावर आवाज उठवण्यास तयार आहे, असं केदार दिघे यांनी सांगितलं.

ते म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण यांना गेल्या बावीस वर्षात झाली नाही, आताच यांना आठवण यायला लागली. बावीस वर्ष हे झोपले होते का, असा सवालही त्यांनी यांनी केला. ते म्हणाले, आनंद दिघे यांचे नाव वापरून राजकारण केलं जातं आहे. त्यांच्या नावाचा वापर करून त्यांची प्रतिमा मलिन केली जात आहेत. त्यांच्या पोस्टवर आनंद दिघे यांचे फोटो लहान झाले आणि यांचे फोटो मोठे होते गेले. अनेक पोस्टरवरून दिघे यांचे फोटोच गायब झाले, असंही केदार दिघे म्हणाले. दरम्यान, रस्ते, पाणी या ठाणेकरांच्या मुलभूत प्रश्नाला बगल देऊन आनंद दिघे यांच्या नावाने स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांना ठाणेकर निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us