Download App

कोकणानं शिवसेनेला निष्ठावंत दिले अन् त्यात काही बांडगूळ… सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

रत्नागिरी : वेगवेगळ्या ऐतिहासिक ओळख असलेल्या कोकणात मी बोलत आहे. शिवसेनेचं कोकणवासियांशी वेगळं नातं आहे. आणि शिवसेनेनंही कोकणाला कायम झुकतं माप दिलंय. कोकणाने शिवसेनेला निष्ठावंत शिलेदार दिले पण अपवाद ठरत काही बांडगूळ सामील झाले. जे बांडगूळ जमले शिवसेनेमुळं ते मोठे झाले. ते मुंबई ते कोकण कसे प्रवास करायचे? त्यानंतर आजपर्यंत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालीय. रामदास कदम या माणसाला उत्तर देण्यासाठी त्यांच्या दहापट ताकतीचा चेहरा आज शिवसेनेत सहभागी होतोय. ही कोकणासाठी ऐतिहासिक बाब आहे.

आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही. ओरिजनल शिवसेना आम्ही आहोत, आणि ओरिजनल शिवसेना सोबत असल्यावर आणि नसल्यावर काय होतं याचंही उत्तर सर्वांना मिळालंय. ओरिजनल शिवसेना सोबत असताना कसबा मतदारसंघ भाजपला मिळत होता आज ओरिजनल शिवसेना नसल्यानं तो त्यांच्या हातातून हिसकावलाय.

रामदास कदम हा तात्या विंचू, त्याला पुरून उरू; भास्कर जाधवांचा घणाघात

रामदास कदम यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, पण काही गोष्टी आवर्जून बोलल्या पाहिजेत. आज आपण माजी आमदार संजय कदम यांच्या पक्षप्रवेशासाठी तर जमलेलो आहोतच, पण आज पक्षप्रमुख आपल्याला संबोधित करणार आहेत. पक्षप्रमुखांच्या विभागवार बैठका होण्यासाठी आज येथून सुरुवात झाली आहे.

एकीकडं महाप्रबोधन यात्रा, एकीकडं शिवसंवाद यात्रा नुकताच पार पडलेला शिवगर्जना सप्ताह आणि त्यानंतर पक्षप्रमुखांच्या पार पडणाऱ्या विभागवार होणाऱ्या सभा का होताहेत? निवडणुका तर लागलेल्या नाहीत तरीही या सभा होताहेत. त्याचं कारण असं आहे की, निवडणुकांत प्रचारसभा घेणारे लोक मतांसाठी सभा घेतात आम्ही इथं मतांसाठी सध्या सभा घेत नाहीत, आम्ही मराठी माणसाच्या हितासाठी सभा घेत आहोत.

मराठी माणसाच्या हिताच्या सभा म्हणजे काय? मराठी माणसाचं हीत जे सरकारनं जोपासलं पाहिजे जे सरकारनं पाहिलं पाहिजे जी सरकारकडून आम्हाला अपेक्षाा आहे. पण अडचण अशी आहे, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले 40 बांड भाऊ जे सतत सांगताहेत की, आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी गेलो आहोत.

त्यांचा गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राशी संवादच तुटत चाललाय. आणि त्यांच्या संवादाऐवजी मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी त्यांचा दिल्लीश्वराशी संवाद चालू आहे. त्यांनी महाराष्ट्राशी संवाद थांबवलाय. महाराष्ट्राच्या हितावर, प्रश्नावर बोलणं थांबवल्याची जोरदार टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

Tags

follow us