Download App

कारखानदार, चोर, दरोडेखोर म्हणूनच अर्थ खात… अन् अजित पवारांवर बोलताना हाकेंची जीभ घसरली

Lakshaman Hake नी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी थेट अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचं म्हटलं आहे.

Lakshaman Hake Criticize Ajit Pawar On Finance Ministry : मागील काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे अजित पवार यांच्यावर (Ajit Pawar) सातत्याने आरोप करत आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा हाकेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी थेट अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचं म्हणत अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

माझ्या वैयक्तिक गोष्टींवर बोलून प्रश्न सुटणार नाहीत. अमोल मिटकरींना आम्ही जो प्रश्न उपस्थित करत आहोत त्याची उत्तर द्यावीत. त्यासाठी अजित पवारांनी एक श्वेतपत्रिका काढावी. अजित पवार हे ओबीसींना पैसे देत नाहीत. तो कारखानदार, चोर आणि दरोडेखोर आहे. 25 कारखाने आहेत त्यांचे. हे पैसे कुठून आले? हे कारखाने कसे उभे राहिले? महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घातला आहे. म्हणून त्यांना अर्थ खात हवं आहे. सत्तेत देखील का जायचं असत?

राजस्थान रॉयल्सचा तरुण फलंदाज वैभवला मिळाली कार; मात्र, ‘या’ गोष्टीमुळं येणार नाही वापरता

तसेच माझा देवेंद्र फडणवीसांना देखील सवाल आहे की, तुम्ही एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं हे समजू शकतो. पण अजित पवारांना सोबत घ्यावं लागलं. यासाठी तुमची काय आगतिकता होती? हे न उलगडणारं कोडं आहे. पण हे लेक म्हणजे सत्तेतून पैसा, पैशातून कारखाने आणि त्या पैशांतून अदानी, अंबानी, कल्याणी आणि पंचशील ग्रुप बांधकाम व्यावसाय असो, कारखाने असो सगळीकडे यांची पार्टनरशिप कशी?

हिंदी भाषेवरून मनसे पुन्हा ‘खळ्ळखट्याक’ च्या तयारीत; ठाकरेंनी थेट धाडलं दादा भुसेंना खरमरीत पत्र

ते सहकारी साखर कारखाने खाजगी कंपनीने विकत घेऊन ते मोडीत काढून असे सगळे कारभार सुरू आहेत. यावर वचक ठेवण्यासाठी आरबीआयकडे एखादं खात आहे की, नाही. दुसरीकडे लक्ष्मण हाकेला समाज व्यवस्थेसमोर लोकांनी भंडारा उधळून सर्वांच्या समोर फॉर्च्युनर दिलीय. तरी या अमोल मिटकरीच्या पोटात दुखतय. पण या लोकांना 25 कारखान्यांसाठी कुठून पैसे आणले? बारामती अॅग्रोसह त्यांच्या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाला ते राजकारण आणि समाजकारण क्षेत्रात काम करतात असं म्हणण्याचा अधिकारन नाही. कारण त्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालून अनेक कारखाने आणि शिक्षणसंस्था उभ्या केल्या आहेत. सहकारातून उद्धार नाही तर पवारांनी सहकारातून स्वाहाकार असं ब्रीदवाक्य निर्माण केलं आहे. असं म्हणत हाकेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

follow us