Download App

Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात सगळी तयारी झालीये; राणेंनी सांगितला भाजपचा इनसाईड प्लॅन

Nitesh Rane on Love Jihad : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार आणि भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले नितेश राणे यांनी लव्ह जिहाद हा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र त्यांनी हा विषय एवढा लावून का धरला आहे? यावर त्यांना लेट्सअप मराठीने ‘लेट्सअप सभा’ या मुलाखत कार्यक्रमात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली लव जिहादबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. ( law on Love Jihad Nitesh Rane explain in Letsupp Sabha Special interview )

Nitesh Rane Uncut Interview : नितेश राणे यांची सडेतोड मुलाखत…

लव्ह जिहादवर काय म्हणाले नितेश राणे?

लव्ह जिहाद हा काही राजकीय विषय नाही. तो एक सामाजिक विषय असून ते हिंदू समाजापुढील आव्हान आहे. हिंदू सामाजाची लोकसंख्या कमी करण्याचं मोठं षडयंत्र म्हणजे धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या माध्यामातून चालवलं जातं. केरळाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी देखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, या धर्मांतर आणि लव जिहादमुळे केरळातील हिंदूंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आम्ही राज्यभर फिरून असंख्य पीडीत हिंदू भगिनींना भेटतो. त्यांना आधार देतो. कारण आजही प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना वाटत की, महाविकास आघाडीचच सरकार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून लव्ह जिहादविरोधात काम करणाऱ्या संघटनांना त्रास होतो.

Nitesh Rane : राऊतांनी ठाकरेंचा पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याची सुपारी घेतली…

लव्ह जिहाद म्हणजे काय?

कोणी- कोणावर प्रेम करावा याला विरोध नाही पण जेव्हा संबंधित तरूण आपलं नाव बदलून हिंदू तरूणीला फसवून लग्न करत असेल तर आमचा विरोध असतो. त्यानंतर त्या तरूणीवर धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जाते. तिच्यावर अत्याचार केला जातो. तिला फसवले जाते. त्यामुळे आमचा विरोध हिंदू-मुस्लिम विवाहाला नाही तर अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या लव्ह जिहादला आहे.

लव्ह जिहादविरोधी कायदा येणार?

लव्ह जिहादविरोधी कायदा अनेक राज्यांत आहे. पण महाराष्ट्रात देशातील सर्वात सक्षम आणि प्रभावी कायदा असावा असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमची टीम चर्चा करत असून अभ्यास दौरे सुरू आहेत. तसेच स्पेशल मॅरिज अॅक्टमध्ये देखील बदल करण्याचा आम्ही विचार करत आहोत. तसेच याचा गैरवापर झाला नाही पाहिजे. या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात मात्र लव्ह जिहादविरोधी कायदा लवकरच येणार. कारण सगळी तयारी झालेली आहे. फक्त आता मिळवलेली सगळी माहिती एकत्र मांडण्याची बाकी आहे.

भाजपचे आमदार आणि भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून नितेश राणे यांच्याकडे पाहिलं जात. त्यांच्याकडून नेहमीच विरोधकांवर हल्लाबोल केला जातो. त्यांच्याकडून मुख्य करून ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जातो. त्याचबरोबर ते लव्ह जिहाद, धर्मांतरण यासारख्या मुद्द्यांवर देखील आक्रमक पवित्रा घेत असतात. अशाच परखड नितेश राणेंची लेट्सअप मराठीने लेट्सअप सभा या मुलाखत सदराखाली मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी लव जिहाद, धर्मांतरण, शिवसेना आणि महाविकास आघाडी या व यासारख्या इतर अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली परखड भूमिका मांडली.

Tags

follow us