Download App

LetsUpp Poll : धक्कादायक! 100 पैकी 80 जण म्हणतात…पंकजाताई तुम्ही भाजप सोडाच

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपमध्ये नाराज असल्याच्या राजकीय चर्चा होतात. अनेकदा भाषणामध्ये त्या आपली नाराजी बोलून दाखवितात. नुकताच एका भाषणात त्यांनी मी भाजपची (Bjp) आहे. पण भाजप माझा पक्ष नाही, असे विधान केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मुंडे या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावरून पंकजा मुंडे यांनी भाजप सोडावा का ? तुम्हाला काय वाटतं ? असा लेट्सअपने पोल घेतला आहे. (letsupp-poll-pankaja-munde-bjp-party-option)

NCP : अहमदनगरमधील कार्यक्रम रद्द; वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन

गेल्या चोवीस तासांमध्ये या पोलमध्ये 59 हजार जणांनी सहभाग नोंदविला आहे. तब्बल 80 टक्के जणांनी पंकजा मुंडे यांनी भाजप सोडावी, असे मत नोंदविले आहे. तर वीस टक्के जणांनी मुंडे यांनी भाजप सोडू नये, असे मत नोंदविले आहे. हे मत नोंदविताना काही जणांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यात संमिश्र प्रतिक्रिया असून, काही जणांनी पंकजा मुंडेंनी भाजप का सोडू नये, याचे कारण सांगितले आहेत. तर काहींनी पंकजा मुंडे यांनी भाजप का सोडावे, कोणत्या पक्षात जावे, अशी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

Pune Loksabha By Election : पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत दुमत पण…

पक्ष सोडणे हा उपाय नाही, स्वतःहाला पक्षात सिद्ध करा व आमदार म्हणून निवडून या, पक्ष सोडण्यापेक्षा परळीतून निवडून येणे किंवा मतदारसंघ बदलून निवडून येणे तर फायदा आहे. पक्ष सोडून काहीही फायदा नाही. मुख्यमंत्री होण्याची घाई करू नका कुठल्या ही पक्षाकडून तुम्हाला मुख्यमंत्री करणं शक्य नाही. पहिले आमदार म्हणून निवडून या, राष्ट्रवादीमध्ये अनेक ओबीसी चेहरे आहे. त्यात पंकजांना महत्त्व नाही. आधीच कोणी विचारत नाही त्यात पक्ष सोडून अजून मोठी नामुष्की ओढून घेऊ नका. ताईसाहेब एकनाथजी खडसे साहेबांचं काय झालं हे तुम्हाला माहीत असेलच. भाजपला सोडलं तर पंकजाताईंचे राजकारण संपुष्टात येईल, पक्षात कुरकुरत बसण्यापेक्षा आपली ताकद वाढवून दाखवावी, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स व मीडियावाले मागे लागतील त्रास देतील, अशा विरोधातील प्रतिक्रिया काहींनी नोंदविल्या आहेत.


पंकजा मुंडेंनी भाजप का सोडावा ?

आधीच पक्ष सोडायला पाहिजे होता. असो येत्या विधानसभेला चांगला आणि योग्य निर्णय घेतील अशा अपेक्षा आहेत. भाजप सोडलेला बरा ! इतर चोरांना मोठी मोठी पदे देतात आणि यांना काहीच देत नाहीत. जिथे आपली आणि आपल्या कामाची कदर होत नाही तेथे आपण थांबू नये, तुम्ही ज्या पक्षाला मोठे केले तेथे बहुजनला स्थान नाही, याचा विचार करा. ईडी, सीबीआयला घाबरू नका, तुम्ही योग्य निर्णय घ्यावा, अशा प्रतिक्रिया काही जणांनी नोंदविल्या आहेत.


पंकजा मुंडेंनी कोणत्या पक्षात जावे ?

काही जणांनी प्रतिक्रिया नोंदविताना पंकजा मुंडे यांनी कोणत्या पक्षात जावे याचे पर्यायही दिले आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे पर्याय सूचविले आहे. तर काहींनी अपक्ष निवडणूक लढावी, असा पर्याय दिला आहे. राष्ट्रीय समाज पक्षात जावून भाजपचे उमेदवार पाडावेत. मला नाय तर कुणाला नाय, ना नफा ना तोटा हा पर्याय वापरावा. भाजप सोडून इतर पक्षात न जाता वेगळा पक्ष स्थापन करावा, असे पर्यायही देण्यात आले आहेत.

Tags

follow us