विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत खांदेपालटांच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला. या घडामोडींवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ यांनीही भाष्य केले. प्रदेशाध्यक्षपदासाठी ते इच्छुक असून अप्रत्यक्षपणे त्यांनी या पदावर दावा ठोकला आहे. यावर लेट्सअप मराठीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणता नेता अधिक सक्षम ठरू शकेल ? असा पोल घेतला आहे. ( letsupp-poll-ncp-leader-ajit-pawar-state-president-favourite, bhujabal and munde)
बाळासाहेब थोरातांचा ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर; सुजय विखेंचा सणसणीत टोला…
या पोलमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड असे चार पर्याय देण्यात आले होते. त्यावर तब्बल 69 हजार वाचकांनी आपले मते नोंदविली आहे. अजित पवार हे प्रदेशाध्यक्षपदासाठी सक्षम नेते ठरू शकतात, अशी पसंती सर्वाधिक जणांनी नोंदविली आहे. तब्बल 66 टक्के जणांनी अजित पवारांचा पर्याय निवडला आहे. इतर तीन ओबीसी नेत्यांवर फारच कमी विश्वास दाखविण्यात आला आहे.
पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी, फडणवीसांचा सवाल
अजित पवारानंतर धनंजय मुंडे यांच्या नावाला पसंती देण्यात आलेली आहे. मुंडेंना केवळ १८ टक्के जणांनी पसंती दर्शविला आहे. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना केवळ बारा टक्के जणांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी सक्षम असल्याचे मत नोंदविले आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांना अवघ्या सहा टक्के जणांनी पसंती दर्शविला आहे.
यावर काही जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळे जगाने सांगितले तरी, पक्षाची धुरा ही रक्ताकडेच. हे दुर्दैव आहे. अजितदादासारखे काम करणार नेतृत्व मिळणार नाही. सुप्रियाताईंच्या क्षमतेवर विश्वास आहे पण तरीही, एकच नेता आमचे अजित दादा, जयंत पाटील हेच योग्य आहेत 2024 नंतर बदल करावा. अजित पवार आक्रमकपणे नक्कीच काम करतील आणि त्याचा फायदा नक्कीच राष्ट्रवादीला होईल, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.