Local Government Bodies Election : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local self-government bodies) निवडणुकांचे वेध कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना लागले. सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रीत केलंय. त्यासाठी या निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेल्या राज्य निवडणूक आयुक्तांच्या Election Commission) निवडीसाठी गुरुवारी (दि. १६) मंत्री परिषदेची बैठक बोलविण्यात आली होती. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या आसपास होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
घरच्यांनी वेडा म्हणून सोडलं अन् बनारसमध्ये वेगळंच घडलं… स्टोरी जाणून व्हाल थक्क
राज्यातील सुमारे २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत आहे. २ वर्षांहून जास्त कालावधीपासून स्थानिक स्वराज्य संस्थावर प्रशासक नेमण्यात आल्यानं स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राज्य पातळीवर वेग आल्याचं दिसतंय. कारण, राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी गुरुवारी (दि. १६) मंत्री परिषदेची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लई धुतल्या तांदुळासारखं आयुष्य जगलोय…सुरेश धसांचं वाल्मिक कराडच्या पत्नीला उत्तर
मुख्यमंत्री करणार राज्य निवडणूक आयुक्ताची शिफारस
गेल्या अनेक दिवसांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या पदावर नियुक्ती करणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी शिफारस करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील विजयोत्सवानंतर आता राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळण्याची तयारी सुरू करतील.
दरम्यान, सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषयी सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) प्रलंबित आहे. मात्र, याच महिन्यात प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यातच ही सुनावणी अंतिम व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितले. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या आसपास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठीच लवकरच मंत्रिमंडळ राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची शिफारस करणार आहे.