Download App

‘मी पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर…’ अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा पलटवार…

आता मला त्यांचा स्वभाव माहित आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्यासमोर आहे

Supriya Sule on Ajit Pawar : मी शरद पवार (Sharad Pawar) यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती… पण मी त्यांचा मुलगा नाही, त्यामुळे मला संधी मिळाली नाही, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता मला त्यांचा स्वभाव माहित आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्यासमोर आहे. सगळं स्पष्ट होईल, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

‘स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात’; ‘प्रादेशिक पक्ष’वरुन अजितदादांनी खरं सांगितलं 

सुप्रिया सुळे यांनी शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुळे म्हणाल्या की,आपला पक्ष चोरला, पण मी म्हणते प्यार से मांगा होता ना तो सबकुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते. मंत्रीपद महत्त्वाचे की निष्ठा महत्वाची असते? अशी विचारणा सुळेंनी केली. आता मला दादांचा स्वभाव माहित आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्यासमोर आहे. सगळं स्पष्ट होईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात’; ‘प्रादेशिक पक्ष’वरुन अजितदादांनी खरं सांगितलं 

सुळे म्हणाल्या, शिरूर लोकसभेचा आपला उमेदवार एक नंबरचा आहे. अमोल दादा माझ्या भावासारखा आहे. आपच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, पण आता आपण मुक्त झालो आतो. माझ्यावर तर पुत्री प्रेमाचा पण आरोप केला जातोय, पण त्यात तथ्य नाही, असं सुळे म्हणाल्या.

सुळे म्हणाल्या की, आपले विरोधी उमेदवार म्हणत आहेत की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला निवडून द्या… अगं बया, मी तर घाबरलेच. शिवाजी आढळराव हे माझ्या वडिलांच्या वयाचे असतील, असे मला आधी वाटलं होतं. पण अजितदादा, दिलीप वळसे आणि उमेदवार एकाच वयाचे आहे. पण, त्यांचा आदर करायला हवा. मात्र, ते म्हणतात, माझी शेवटची निवडणूक आहे, ऐकूण वाईट वाटलं, असा टोला सुळेंनी लगावला.

आजवर आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आलेत, पण आता आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत नाहीत. ‘डंके की चोट पर मी सांगतो, आता आमच्यावर बोलून दाखवा. पण, मी अशोक चव्हाणांची बाजू घेऊन तोंडावर पडले. आजवर भाजपने त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले अन् चव्हाण भाजपवाशी होताच त्यांना खासदारकी दिली, भाजप आता चव्हाण यांच्यावर आरोप करत नाही, त्या आरोपाचं काय झालं, असा सवाल सुळेंनी केला.

follow us