Download App

लोंढे म्हणाले, देशमुखांचे मानसिक संतुलन तपासण्याची गरज

मुंबई : कॉंग्रेस (Congress)नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh)हे सातत्याने वरिष्ठ नेत्यांवर टीका करत असतात. त्यांच्यावर टिकेची झोड उठवत असतात. ते कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)असो नाना पटोले (Nana Patole)असो, राहुल गांधी (Rahul Gandhi)असो किंवा अन्य कोणी असो यांच्यावर टीका करतात. याच्यावरुन लक्षात येते की आशिष देशमुखांचे मानसिक संतुलन (mental balance)तपासण्याची गरज असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe)यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, देशमुख यांना कुठेतरी लोकांचाही सपोर्ट नाही आणि पक्षविरोधी कारवाया (Anti-Party Activities)करुन आपल्याला लोकांचं लक्ष वेधून घण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा प्रकारची जोरदार टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.

चीनची पुन्हा नापाक करतूत, अरुणाचलच्या 11 ठिकाणांची नावं बदलली

आशिष देशमुख यांनी कॉंग्रेसमध्ये राहून कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. देशमुख यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, नाना पटोले यांच्यावर टीका केली. त्यामुळे आशिष देशमुखांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेश कॉंग्रेसच्या शिस्तभंग समितीकडून याचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडं पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आशिष देशमुखांना तुम्ही वारंवार पक्षविरोधी, पक्षाच्या नेत्यांवर वारंवार टीका केल्याची विचारणा करण्यात आली. त्याबाबतचं एक पत्र आशिष देशमुखांना देण्यात आलं आहे, मात्र त्यांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही किंवा माफी देखील मागितली नाही. त्यामुळं आशिष देशमुखांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देशमुख यांच्याबद्दल कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यांनी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाष्य केलं होतं. त्याचबरोबर राहुल गांधींनी माफी मागावी असंही ते म्हणाले होते. त्यामुळे आता कॉंग्रेसचे प्रवक्ते यांनी एका व्हिडीओद्वारे देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Tags

follow us