Download App

राष्ट्रवादीकडून जिल्हा विभाजनाला धार! जगताप म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा…

Ahmednagar News : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे दिसत असले तरी राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन मात्र रखडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाला हवा दिली आहे.

नगर जिल्ह्याच्या नामांतराच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आ. जगताप म्हणाले, नामांतराच्या निर्णयाचं स्वागतच आहे. याबद्दल आनंद झाला. पण, नामांतराबरोबरच मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा निर्णय जाहीर केला असता तर हाच आनंद द्विगुणित झाला असता.

Ahmednagar : नामांतराच्या घोषणेने निघाली जिल्हा विभाजनाच्या जखमेची खपली; दोन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण…

नामांतराचा मुद्दा महत्वाचा आहे. नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. मात्र, भविष्यात कधीतरी जिल्हा विभाजन ज्यावेळी होईल. त्यावेळी जिल्ह्याचे नाव काय किंवा त्या जिल्ह्याचे नाव काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नामांतर घोषित करतानाच जिल्हा विभाजन घोषित केले असते तर जास्त आनंद झाला असता, असे जगताप म्हणाले. राज्यात नगर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना प्रशासनाला अनेकदा अडचणी येतात. ताण येतो. प्रशासनाच्या प्रमुखांनाही मोठं काम करावं लागतं, या गोष्टींचा विचार होणे गरजेचे असल्याचे जगताप म्हणाले.

जिल्हा विभाजनाची मागणी किती जुनी ?

सर्वात पहिल्यांदा जिल्हा विभाजनाची घोषणा शरद पवार मुख्यमंत्री असताना झाली होती. सोनई (ता. नेवासा) येथील एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली होती. पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. तर सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असतानाही अशीच घोषणा झाली होती. श्रीरामपूर हे जिल्ह्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर 2000 मध्ये जिल्हा विभाजनासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली होती.

Tags

follow us