अधिकाऱ्यांना तंबी देण्याची मंत्री विखे पाटलांवर आली वेळ; वाळू विक्री केंद्रावर नक्की काय झालं?

Radhakrishna Vikhe : सर्वसामान्‍य नागरिकांसाठी सुरू केलेल्‍या वाळू धोरणाच्‍या अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिल्या. संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन मंत्री विखे यांच्‍या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्‍हाधिकारी सिद्धराम […]

Radhakrushn

Radhakrushna vikhe shirdi collector office

Radhakrishna Vikhe : सर्वसामान्‍य नागरिकांसाठी सुरू केलेल्‍या वाळू धोरणाच्‍या अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिल्या. संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन मंत्री विखे यांच्‍या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सुहास मापारी, संगमनेर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, शा‍ळीग्राम होडगर, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कैलास तांबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते‌.

पंजाबचं तूप, गुजरातचं मीठ मोदींनी बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये महाराष्ट्रातील ‘ही’ वस्तू

वाळू व्यवसायातून सुरु असलेले राजकारण आणि गुन्‍हेगारीकरण थां‍बविण्‍याचा प्रयत्‍न सरकारने केला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील वाळू विक्री केंद्रातून २० हजार ब्रास वाळू उपलब्‍ध केली आहे. यामधून राज्‍य सरकारच्‍या तिजोरीत ६०० रुपये दराने थेट रक्‍‍कम जमा झाली आहे. राज्‍य सरकार हे सामान्‍य माणसाच्‍या हिताचे निर्णय घेत आहे.राज्‍यातील प्रत्‍येक घटकाला न्‍याय देण्‍याची भूमिका सरकार घेत असल्‍याचे‌ही महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्‍यातील दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना न्‍याय देण्‍यासाठी २२ जून रोजी पुण्‍यामध्‍ये खासगी आणि सहकारी दूध संघ चालकांची महत्‍वपूर्ण बैठक होणार आहे. पशुखाद्य कंपन्‍यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्‍यात आले आहे. दूध उत्‍पादकांवरील अन्‍याय सहन करणार नाही ही भूमिका घेवून सरकार त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्‍वाही महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.

अजितदादा बोलले पण, भुजबळांनीच प्रदेशाध्यक्षपदावर ठोकला दावा; सांगितला ‘हा’ फॉर्म्युला

Exit mobile version