पालघर बाजार समितीत महाविकास आघाडीचा डंका; शिंदे गटाला मिळाला भोपळा !

APMC Election 2023 : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी काल शु्क्रवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही बाजार समित्यांचे निकाल जाहीर होत आहेत. पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.आघाडीने 17 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिंदे गटाला […]

MVA

MVA

APMC Election 2023 : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी काल शु्क्रवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही बाजार समित्यांचे निकाल जाहीर होत आहेत. पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.आघाडीने 17 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिंदे गटाला भोपळाही फोडता आला नाही. 15 जागी महाविकास आघाडीने बिनविरोध विजय मिळवला आहे तर व्यापरी गटाच्या दोन जागांसाठी चार जणांत लढत होती. याही निवडणुकीत मतदारांनी आघाडीच्याच बाजून कौल दिला. त्यामुळे बाजार समितीत शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे.

राहुरी बाजार समिती तनपुरेंकडे

शुक्रवारी मतदानानंतर लगेचच नगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समिती मतदानाची मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. भाजप खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना पराभवाचा धक्का बसला.

या निवडणुकीत तनपुरे यांच्या पॅनलने भाजप पुरस्कृत पॅनलचा पराभव केला. तनपुरे गटाने 18 पैकी 16 जागा खिशात घातल्या. बाजार समितीवर सत्ता कायम ठेवण्यातही यश मिळवले.

या व्यतिरिक्त संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना धक्का देत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील पॅनलने आतापर्यंत सात जागा जिंकल्या आहेत.

Exit mobile version