Download App

विधानसभा अधिवेशनाचा पहिला दिवस; उद्यापर्यंत कामकाज स्थगित, वादळी चर्चा होण्याची शक्यता

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड पाहायला मिळाली. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Assembly Monsoon Session Today: आजपासून विधानसभेचे या पंचवार्षिकमधील अखेरचं अधिवेशन (Monsoon Session ) सुरू होतय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर जोरदा टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकरी, नीट परीक्षा या मुद्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा घेरलं आहे. विधिमंडळाच्या आवाराता विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन विदळी होण्याची शक्यता आहे. आज प्राथमिक कामकाज होऊन सभागृहाचं कामकाज उद्या 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

जनतेने नतद्रष्ट सरकारच्या छातीतली हवा काढली; वडेट्टीवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर घणाघात

महायुतीलाच जनतेचा आशीर्वाद मिळेल

मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावरील पत्रकार परिषदेत घेतली. त्यामध्ये विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं. लोकसभेच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा आनंद क्षणिक आहे. महायुती सरकारची दोन वर्षांतील कामगिरी आणि अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण तरतुदींमुळे जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होईल आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच जनतेचा आशीर्वाद मिळेल असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

वडेट्टीवरांची टीका नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन अमेरिकेतून भारतात परतले; हिंदू राष्ट्राबद्दल केलं मोठं विधान

काल झालेल्या महाविका आघाडीच्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनीही महायुती सरकारवर घणाघाती टीका केली आहे. फुगलेल्या छातीतील हवा जनतेने काढली आहे असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. आज राजश्री शाहु महाराजांची जयंती आहे. ते लोकशाहीवादी होते. मात्र, दोन वर्षापूर्वी लोकशाहीचा गळा घोटून राज्यात सरकार स्थापन करण्यात आलं असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. परंतु, अहंकाही आणि हुकुमशाही पद्धतीने कुणाचंच राज्य चालू शकत नाही हे लोकांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिलं आहे असा प्रहारही त्यांनी यावेळी केला.

 मनुस्मृतीला समर्थन नाही

गेल्या अनेक दिवसांपासून मनुस्मृतीचा विषय गाजतो आहे. त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील कोणत्याही श्लोकाचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्य सरकारचे मनुस्मृतीला समर्थन नाही व या मुद्द्याला महाराष्ट्रात स्थान नाही, हे विरोधकांना माहीत आहे. तरीही विरोधकांकडून हे मुद्दे उपस्थित करून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकारचं राजकारण करणं योग्य नाही व ते महाराष्ट्राला परवडणारं नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

या आमदारांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारला

follow us

वेब स्टोरीज