Download App

विधानसभा निवडणूक! भाजपची रणनीती ठरली; 21 नेत्यांवर जबाबदारी, तर गडकरींच्या हाती कमान

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विशेष प्रचारक असणार आहेत तर इतर 21 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलीयं.

BJP : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) वारं वाहु लागलंय. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता विधानसभेसाठी भाजपने चांगलीच कंबर कसलीयं. विधासनभा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती ठरली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हाती महाराष्ट्राची कमान देण्यात आलीयं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे यांच्यावर भाजपने महत्वाची जबादारी दिलीयं.

video : शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ तर सुप्रिया सुळे… भाजप आमदार पडळकरांची घणाघाती टीका

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने आता नितीन गडकरींना मैदानात उतरणार आहेत. गडकरी यांना विधानसभा निवडणुकीचं विशेष प्रचारकपद देण्यात आलंय. त्यामुळे आता नितीन गडकरी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात फिरुन उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावणार आहेत. तसेच प्रचारही करणार आहेत. त्यामुळे आता नितीन गडकरी यांच्याकडेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची कमान हाती आली असल्याचं बोललं जात आहे.

मोठी बातमी ! मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या संयोजकपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आलीयं. त्यामुळे आता भाजपच्या विजयासाठी गडकरी, फडणवीस, दानवे, बावनकुळे या नेत्यांना प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे.

Lalbaugcha Raja : ‘लालबाग’चा राजा सार्वजनिक मंडळात अनंत अंबानींची मानाच्या पदावर नियुक्ती…

एवढंच नाही तर भाजपकडून स्टार प्रचारकांचीही घोषणा करण्यात आलीयं. या स्टार प्रचारकांमध्ये काँग्रेसमधून भाजपात उडी घेतलेले अनेक नेते आहेत. यामध्ये खासदार अशोक चव्हाण, नारायण राणे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, जयकुमार रावल, संजय कुटे, अतुल सावे, भाई गिरकर, प्रविण दरेकर, विजया रहाटकर, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन, या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, अवघ्या काही महिन्यांत महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी महाविकास आघाडीचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहेत. हे आव्हान भाजपचे नेते कसं पेलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us