Download App

विधान परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा ! गोऱ्हे व पडळकरांमध्ये जोरदार खडाजंगी, नेमकी काय घडलं ?

  • Written By: Last Updated:

विधानपरिषदेचे बुधवारी रात्री उशीरापर्यंत कामकाज सुरू होते. या कामकाजाच्या दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे व गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. जास्त वेळ बोलू न दिल्याने गोपीचंद पडळकर यांनी थेट उपसभापती गोऱ्हे यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर गोऱ्हेही चिडल्या. तर काही सदस्यांनी गोपीचंद पडळकर हे चुकीचे वागत असल्याचे सांगून कामकाजातील काही गोष्टी काढून टाकण्याची विनंती केली. जोरदार खडाजंगीनंतर गोऱ्हे यांनी पडळकर यांना उद्या (गुरुवारी) दिवसभर बोलायचे नाही, अशी शिक्षाही सुनावली आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा घणाघात…

गोपीचंद पडळकर हे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बोलण्यास उठले. ओबीसी, धनगर, जत तालुक्याच्या दुष्काळ हे प्रश्न त्यांनी मांडले. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना थांबविण्यास सांगितले. इतर सदस्य बोलणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. त्यानंतर पडळकर यांनी आठ-दहा मुद्दे मांडणार असल्याचे सांगितले. इतर सदस्य थांबलेले आहेत. त्यांना बोलायचे असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर पडळकर हे गोऱ्हे यांच्यावर जोरदार चिडले. तुमचे नियोजन नीट ठेवा, दुसऱ्याला दीड तास देता. मला वेळ देत नाही, तुम्ही वेळेचे नियोजन करत नाही. घंटी वाजवत बसतात. मी तुमचा निषेध करता, अशी भाषा पडळकर यांनी वापरली.

अजितदादांनी सरड्यासारखेच रंग बदलले, नाना पटोले यांची जळजळीत टीका…

त्यावरून गोऱ्हे यांनीही पडळकरांना जोरदार फटकारले. तुम्ही तेरा मिनिटे बोलला आहात. तुम्ही चुकीचे वर्तन केले आहे. तरी तुम्ही बोलत आहात.मी, तुम्हाला ताकीद देते. साडेआठ वाजले आहेत. इतरांना बोलायचे आहे. इतरांशी तुलना करू नका, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

शेवटी दानवे, सचिन अहिर गोऱ्हेंच्या मदतीला

गोऱ्हे यांचा निषेध करण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर हेही आक्रमक झाले. पडळकर यांचे वागणे चुकीचे आहे. सभापतींचा निषेध करणे हा त्यांचा अपमान आहे. सभागृहाचा अपमान असल्याचे दानवे व अहिर यांनी म्हटले. त्यानंतर गोऱ्हे यांनी पडळकर यांना उद्या दिवसभर सभागृहात बोलू नये, अशी शिक्षा सुनावली. त्यावेळी पडळकर काहीतरी पुटपुटले. त्यावर गोऱ्हे यांनी तुमचा स्क्रू ढिल्ला झालाय, अशी कमेंट केली.

Tags

follow us