‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने अस्वस्थता; फडणवीस, सांभाळा! सामनातून टीकेचे बाण

Devendra Fadnavis : ठाकरे गटाने राज्य सरकारवरील हल्ले आधिक तीव्र केले आहेत. फडणवीस, सांभाळा!, या शीर्षकाखालील सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात येऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते. पण, ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि ते अहंकाराचे महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ […]

Uddhav Thaceray And Devendra Fadnavis

Uddhav Thaceray And Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : ठाकरे गटाने राज्य सरकारवरील हल्ले आधिक तीव्र केले आहेत. फडणवीस, सांभाळा!, या शीर्षकाखालील सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात येऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते. पण, ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि ते अहंकाराचे महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले आहे.

अशा परिस्थितीत त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजलेच नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ ची नशा ही देशी बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी देशी स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत, फडणवीस सांभाळा ! असे टीकेचे बाण या लेखातून सोडले आहेत.

शरद पवारांच्या फोटोचं ‘पॉलिटिक्स’ जोरात; भुजबळांना आठवले पवारांचे ‘ते’ जुने शब्द

झोपलेल्यांना जागे करता येते पण, झोपेचे सोंग घेऊन पडलेल्यांना जागे कसे करायचे हे प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री, ते सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसे झालेही होते. परंतु, काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच, असे श्री. फडणवीस यांनी पुन: पुन्हा, पुन: पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था असल्याचे या लेखात म्हटले आहे.

2014 मध्ये बेईमानीची बीजे भाजपने रोवली

2019 च्या बेईमानीमुळेच युती तुटली. 2014 सालात या बेईमानीची बीजे भाजपने रोवली याचा खुलासा श्री. एकनाथ खडसे यांनी केलाच आहे. त्यामुळे ज्या काही बेइमान लोकांमुळे फडणवीस 2019 ला येऊ शकले नाहीत ते सर्व बेइमान त्यांच्याच घरात आहेत. फडणवीस म्हणतात, पहा, मी पुन्हा आलो. हे सत्य नाही. ते आजिबात आलेले नाहीत, तर दिल्लीने त्यांचे राजकीय श्राद्ध घालण्याचा प्रयोग केला. फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला बिनपगारी उपअधिकारी करून टाकले. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रात चिंतेची स्थिती निर्माण झाली. फडणवीस हे भांबावलेल्या मनःस्थितीत असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनल्याची टीका या लेखात करण्यात आली आहे.

Exit mobile version