Download App

मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार ? ; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांना माशीसारखं बाजूला..

Prithviraj Chavan News : भाजपबरोबर जाणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तरी देखील वावड्या उठवल्या जात आहेत. कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी तर कधी माझ्याबद्दलही अशा वावड्या उठवल्या गेल्या. या चक्रातून भाजपला बाहेर पडायचे असून नव्या लोकांना पक्षात घेतले जाऊ शकते. यासाठी मुख्यमंत्र्यांचा बळी जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांना दुधातल्या माशीसारखे फेकून द्यायचे हे काही बरोबर नाही. या पदाचा मान राखला गेलाच पाहिजे,अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केली.

चव्हाण यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी तर कधी माझ्याबद्दलही अशा वावड्या उठवल्या गेल्या. या चक्रातून भाजपला बाहेर पडायचे असून नव्या लोकांना पक्षात घेतले जाऊ शकते. यासाठी कुणाला तरी मुख्यमंत्री केले जाऊ शकते.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

हे योग्य नाही. मुख्यमंत्री करायचे आणि नंतर दुधातल्या माशीसारखे फेकून द्यायचे हे योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले.

उत्तरे द्यावीच लागतील 

उद्योगपती गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कुणी-कुणाला भेटावे यावर मी काय बोलणार. त्या एकमेकांचे जुने संबंध आहेत. त्यांचे सहकार्य घेण्याकरिता ते भेटले असतील. यावर मी काही बोलू शकणार नाही. अदानींबद्दलचे आमचे प्रश्न कायम आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे अदानी व पंतप्रधानांनी दिली पाहिजेत. राहुल गांधींच्या प्रश्नांवर अदानींना उत्तर द्यावीच लागतील. तसेच पंतप्रधानांना याची उत्तरे द्यावीच लागतील, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

न्यायाधीशांकडून चौकशी करा 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सरकारी कार्यक्रम होता. सरकारी कार्यक्रमाची वेळ सरकारकडूनच निश्चित केली जाते. कोणत्या तरी राजकीय नेत्यांना दाखविण्यासाठी ही गर्दी केली होती. पण, यातील एकही माणूस हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी आला नव्हता तर तो आप्पासाहेबांसाठी आला होता. येथे मंडपही टाकला गेला नव्हता. या घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

 

Tags

follow us