MLC Result : पदवीधरच्या तिन्ही जागांवर मविआचं वर्चस्व; दोन शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा डंका!

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत पदवीधरच्या तीन जागांवर महाविकास आघाडी तर शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांवर महायुतीचं वर्चस्व स्थापन झालंय.

Untitle

Untitle

Vidhan Parishad MLC Result : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा (Vidhan Parishad MLC Result) निकाल आता स्पष्ट झाले आहेत. एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने आपलं वर्चस्व स्थापन केलंय. पदवीधर 3 जागांवर महाविकास आघाडी तर शिक्षक मतदारसंघाच्या 2 जागांवर महायुतीने विजय मिळवलायं. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात रात्री उशिराने मोठा उलटफेर पाहायला मिळालायं. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना धूळ चारत पराभवाचा धक्का दिलायं. नागपूर हा भाजपचा गड मानला जात असल्याने भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र मतांचे गणिते बदलल्याने वंजारी यांना विजय मिळालायं.

तर औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी बाजी मारली. विद्यमान आमदार अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्या १८ वर्षांपासूनच्या मतदारसंघावरील वर्चस्वाला धक्का बसला आहे. दुसर्‍या पसंतीची ३९ पैकी २३ उमेदवारांची मते मोजल्यानंतर चव्हाण यांना ६०,९३५ मते तर प्रतापसिंह पाटील यांना ७४,१४२ मते होती. १३,२०७ मतांची आघाडी घेत पाटील यांनी विजय मिळवला.

राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविला. प्रदीर्घ मतमोजणीनंतर ४४ व्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत हर्षदा यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्मिता जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव केला. हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख १३ हजार ८४० मते मिळाली, तर स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले.

तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांनी १८ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भाजपचा झेंडा फडकविला. गावडे यांनी शिंदेसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांचा ६,७७० मतांनी पराभव केला. एकूण वैध मतांमधून २५,७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यात गावडे यांना निर्धारित मते न मिळाल्याने २७ बाद फेऱ्यांनंतर २३,१७७ मते मिळाली. तर सानप यांना १६,३४७ मते मिळाली. येथून आजवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये गावडे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. विद्यमान आमदार काँग्रेसचे जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर राहिले.

Exit mobile version