Download App

Sanjay Shirsat राऊतांवर भडकले म्हणाले, आपण पाकिस्तानात..

Sanjay Shirsat on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर राजकारणाचा पारा चढला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) देखील राऊतांवर संतापले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब तर उसळणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो. गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना 2024 च्या निवडणुकीआधी केली जाईल, अशी भीती देशातील अनेक प्रमुख पक्षांना वाटतेय’, असे खळबळजनक वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी भाविक मोठ्या आनंदाने जाणार आहेत. त्यांचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे. यांच्यावर खरंतर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. लोकांमध्ये संभ्रम का निर्माण करताय? हा देश आपला आहे की आपण पाकिस्तानात राहतोय? असे संतप्त सवाल शिरसाट यांनी केले.

राऊत अन् ठाकरेंची नार्को करा! Nitesh Rane एटीएसला देणार पत्र

राऊत-ठाकरेंची नार्को करा – राणे

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप करत या दोघांची चौकशी करून नार्को चाचणी करा, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी एटीएसला पत्र पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडे जर राम मंदिर अयोध्येकडे जात असताना दंगल भडकण्याची माहिती असेल तर तत्काळ सरकारी यंत्रणांना माहिती दिली पाहिजे. आता मी स्वतः एटीएसला पत्र लिहीणार आहे आणि अशी मागणी करणार आहे की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची सखोल चौकशी करा वाटत असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा. यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे ती गोळा करून दंगली थांबवाव्यात अशी मागणी मी करणार असल्याचे राणे म्हणाले.

‘सत्ताधाऱ्यांना दुष्काळाची जाणीव आहे का?’ सरकारच्या उधळपट्टीवर जयंत पाटील संतापले

Tags

follow us