Devendra Fadnavis : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची कविता कुणी ऐकली नसेल असा एकही राजकीय नेता निदान महाराष्ट्रात तरी नसेल. इतकेच काय तर संसदेतही त्यांच्या कविता बऱ्याचदा हास्यकल्लोळ उडवून जातात. आता त्यांच्याच कवितेची स्टाईल घेत विधिमंडळ अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले वक्तव्य चांगलेच गाजत आहे. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडावरून अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बजेट संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची उत्तरे आज फडणवीस यांनी सभागृहात दिली. फडणवीस यांनी आधीच्या आणि आत्ताच्या बजेटमधील आकडेवारीचा हवाला देत शिवसेनेला किती टक्के निधी दिला जात होता हे सांगताना मंत्री रामदास आठवले यांच्या खास स्टाईलचा आधार घेत माहिती दिली. त्यांनी जे वक्तव्य केले त्यावरून सभागृहात चांगलाच हशा पिकला.
Balloon Dilation : एम्सच्या डॉक्टरांचा चमत्कार! गर्भातील बाळावर केली यशस्वी सर्जरी
फडणवीस म्हणाले, रामदास आठवले यांच्याच स्टाइलमध्ये सांगायचे झाले तर तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी असे वक्तव्य केले. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवरून अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला लगावल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहातील सदस्य चांगलेच हसू लागले.