Ajit Pawar vs Vijay Shivtare : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) नावाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. त्यांनी केलेली वक्तव्ये तसेच त्यांची टीका त्यांच्या विरोधकांना चांगलीच झोंबत आहे. आताही अजितदादांनी केलेली टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी आक्रमक होत या टीकेवर अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘ना घर का ना घाट का’, असे म्हणत अजित पवारांचा पुढे राज ठाकरे होणार असे शिवतारे यांनी म्हटले आहे.
अजित पवार भाजपसोबत जाणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. या मुद्द्यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण देत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले होते. तरी देखील या चर्चा काही थांबलेल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी काल एका कार्यक्रमात आणखी काही धक्कादायक वक्तव्ये केली त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे.
किसान सभा आक्रमक; महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर राज्यव्यापी पायी मोर्चा
काय म्हणाले होते अजितदादा ?
एका मुलाखतीत अजित पवार म्हणाले होते की विजय शिवतारे हे खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत होते. पवार साहेबांची उंची आणि सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील कामकाज पाहून त्यांच्यावर टीका होणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे कुणाला जर मस्ती आली असेल तर ती जिरवण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.
शिवतारे काय म्हणाले ?
अजित पवार यांचे रोखठोक परखड बोलणे असले तरी त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढला जात आहे. स्वतःच्या घरातून त्यांना विरोध आहे. जे शिवसेनेत घडले होते तेच आता त्यांच्या बाबतीत होत आहे. ताकद चांगली असतानाही राज ठाकरेंना डावलून महाबळेश्वरच्या सभेत उद्धव ठाकरे यांना वारस करण्यात आले होते.
रामनवमी, हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठी; आव्हाडांचं हिंदू सणांबाबत वादग्रस्त वक्तव्य
अजित पवार यांची पक्षात अडचण होत आहे. शरद पवार यांनी मुलीच्या हातात पक्ष द्यायचा आहे. त्यासाठीच ही डिप्लोमसी सुरू आहे. अजित पवार यांनी माज उतरवण्याची भाषा करू नये. स्वतःच्या मुलाला का निवडून आणू शकले नाहीत, असा प्रश्न शिवतारे यांनी विचारला.