Maharashtra Ncp Committee resolution Sharad Pawar ncp president : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबल माजली आहे. तर दुसरूकडे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत. दरम्यान कार्याकर्त्यांनी केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर मला विचार करायाला वेळ द्या म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी आवाहन केले.
यावर आता शरद पवार अध्यक्ष राहणार का? नाही तर नवा अध्यक्ष कोण असणार यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीची आज बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये काय होणार याकडे लक्ष लागलेले असाताना या दरम्यान राष्ट्रवादीच्याच एका मोठ्या नेत्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.
दरम्यान अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीने एक ठराव केला आहे. ज्यामध्ये ठराव करण्यात आला आहे. की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनीच रहावं. असा या ठरावात म्हटलं आहे. तर या ठरावावर अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सह्या आहेत.
मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या वायबी सेंटर बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.