Download App

ठाण्यात येणार अन् जिंकूनच दाखवणार; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना चॅलेंज !

Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे येथे आज महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे नेते आ. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाणे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ आज ठाण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर खोचक टीका केली. तसेच ठाण्यात येणार, येथे लढणार आणि जिंकूनच दाखवणार, असे चॅलेंज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील सरकार फार दिवसांचे नाही तर काही तासांचेच राहिले आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येणार आहोत. सत्तेत आल्यानंतर सूडासाठी नाही तर लोकांसाठी आम्ही चौकशा करू आणि जेलभरो करू’, असा इशारा ठाकरे यांनी दिला. ‘आता कोणत्याही परिस्थितीत महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत. या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रत्येक जिल्ह्यात नारी सन्मान यात्रा काढली जाणार आहे.’

ठाकरी बाणाच्या तोफेसमोर काडतूसाचा… सुषमा अंधारेंकडून फडणवीसांचा समाचार

 

कितीही केसेस टाका, तुमच्या चौकशी करणारच 

ते पुढे म्हणाले, ‘ठाण्यात काल आलो, आजही आलो. येथे काही वेळ थांबलो. त्यावेळी लोक म्हणाले आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. गद्दारी झाली राज्यात. आमच्या सभेसाठीही या सरकारने अनेक अटी टाकल्या. तरी आम्ही घाबरणार नाही. आमच्यावर केसेस टाका होऊन जाऊ द्या एकदा’, असे आव्हान त्यांनी दिले. ‘महिलेला मारहाण केली जाते. कशासाठी तर पोस्ट टाकली म्हणून. राज्यात मोगलाई आली असे आता वाटत आहे. येथे गुजरातचेच मुख्यमंत्री बसले आहेत. महाराष्ट्राचे नाहीतच.’

‘पोलीस आयुक्त वर्षा बंगल्यावर असतात. तिथूनच त्यांना सांगितले जाते की कुणावर कारवाई करायची. हे असे सरकार आता काही तासांचेच राहिले आहे. आमचे सरकार पुन्हा येणार आहे. त्यानंतर लोकांच्या गरजेचे जे आहे ते करणार. जे कुणी असतील त्यांना सांगतो. सरकार आल्यावर चौकशी करणार, जेलभरोही करणार’, असा इशारा ठाकरे यांना दिला.

ते म्हणाले, ‘आज मी येथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. गद्दार गँगच्या नेत्याचे कौतुक करायला आलो आहे. ठाणे शहराचे इतका नावलौकिक होता. मात्र कालच्या एका प्रकाराने अख्ख्या शहराला बदनाम केले. प्रथमच असे घडले. महिलेला मारहाण करता. माफीचा व्हिडीओ बनवता. तुम्ही तर माफ करायच्या लायकीचे नाहीत आणि तुम्हाला माफी सुद्धा मिळणार नाही.’

Rajan Vichare : पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जाताहेत

 

मुख्यमंत्र्यांचे तोंडाला कुलुप

पोस्ट टाकल्या म्हणून ही वागणूक दिली जाते. मुख्यमंत्री म्हणून काहीच बोलला नाहीत. तरीही मी कौतुक करायला आलोय. महिलेला मारहाण केली जाते. दवाखान्याच्य बाहेर पोलीस तैनात केले आहेत.  हे कसे राज्य चालू शकते ?, राज्य करता तेव्हा सगळी लोकं तुमची असतात. किती कौतुक करायचे या माणसाचे. मी तर आता आरतीची थाळीच आणायला विसरलो’, असा टोला त्यांनी लगावला.

Tags

follow us