Download App

चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने खळबळ ! म्हणाले, अमोल कोल्हे भाजपात येणार असतील तर..

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रसेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपा प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी मध्यंतरी जोर धरला होता. त्यांच्या एका भाषणाच्या क्लिप्स व्हायरल करून भाजप प्रवेशाचा दावाही केला जात होता. त्यानंतर कोल्हे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. आता मात्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांच्या वक्तव्याने कोल्हे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

पाटील म्हणाले, ‘सध्या शिंदे गटाकडे 49 संख्याबळ आहे. निवडणुकीत त्यांना तेवढ्यावरच थांबवायचे असा कोणताही विचार कोणाच्याही डोक्यात नाही. बावनकुळे यांनाही तसे म्हणायच नव्हते. यावर आत्ताच निर्णय घेणेही शक्य नाही. बैठका होतील, चर्चा होईल, नवीन माणसं येतील.’

‘लोकसभा निवडणुका मार्चमध्ये सुरू होऊन सहा टप्प्यात होणार असतील तर त्याची चर्चा जानेवारी महिन्यात सुरू होईल. हातकणंगले किंवा शिरुरसारख्या मतदारसंघाचे काय करायचे असे मुद्दे येतात. त्यामुळे आत्ताच शिरुरचं काय करायचं हे कसं ठरवणार ? मागील वेळी या मतदारसंघातून आढळराव पाटील लढले होते. 2019 मध्ये अमोल कोल्हे विजयी झाले.

Akash Thosar : वडिलांबरोबरचा ‘तो’ किस्सा सांगत आकाश ठोसर झाला भावुक

पण समजा कोल्हेंना निवडणुकीच्या चार महिने आधी असं वाटू शकतं की आपण भाजपात जावं. विद्यमान खासदार म्हणून त्यांनाच तिकीट द्यावं लागेल ते ठीक आहे पण, मग विषय येईल की ते कुणाकडून लढणार ?  शिदेंकडून की भाजपकडून ? मग त्यांना विचारले जाईल’ असे पाटील म्हणाले.

पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. ‘आढळरावांसारखा तीन वेळचा खासदार असतानाही जर कोल्हे भाजपात येणार असतील तर आढळरावांना समजावलं जाईल की कोल्हे खासदार आहेत. त्यानंतर मात्र कोल्हे यांनाच निर्णय घ्यावा लागेल की कुणाकडून लढायचे ?’, असे पाटील म्हणाले.

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय

दरम्यान, पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरून  खासदार कोल्हे खरच भाजपात येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी आधीही या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मात्र पाटील यांनी नव्याने वक्तव्य केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आता खासदार कोल्हे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us