Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या वर्धापनदिनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी टीका केली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.
फडणवीस आज रामटेकमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यावर फडणवीस म्हणाले, याला भाकरी फिरवणं म्हणतात असं मला वाटत नाही. ही काही भाकरी फिरलेली नाही. ही धूळफेक आहे पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
Ajit Pawar : फडणवीस म्हणतात धूळफेक, अजितदादा म्हणाले, त्यांचं काम फक्त…
या निर्णयानुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद सोपवल्यानंतर आता राज्यातील निवडणुकांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल. देशभरातील आगामी निवडणुकीची जबाबदारी हे नवे कार्याध्यक्ष सांभाळतील.
सुप्रिया सुळे या महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सांभाळतील. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान आणि गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. भाजपनं काय करावं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे तसं राष्ट्रवादीनं काय करावं हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीची कार्यकारिणी, आमदार, खासदार त्याबद्दलचा निर्णय घेतील. आमची विचारधारा आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. टीकाटिप्पणी करणे हे त्यांचं काम आहे त्यामुळे ते बोलतात. पण, त्याकडे फार महत्व दिलं पाहिजे असं मला काही वाटत नाही.
रोहित पवारांना मोठा धक्का; कर्जत बाजार समिती राम शिंदेंच्या ताब्यात