Download App

आता निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? राष्ट्रवादीने थेट आकडाच सांगितला

NCP News : दोन दिवसांपूर्वी न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने आगामी विधानसभा निवडणुकांदर्भात जारी केलेल्या सर्व्हेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या सर्व्हेत भाजप (BJP) पु्न्हा राज्यात सरकार स्थापन करील असा दावा करण्यात आला आहे. या सर्व्हेवर प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) टीका केली आहे. आज राज्यात निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.

न्यूज एरिना इंडियाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही. भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षांतर घडवून आणले आणि महाविकास आघाडी सरकार पाडले हे राज्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच नव्हे, तर राज्यातील आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्येही भाजपला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार वाट पाहत आहेत असा दावा तपासे यांनी केला आहे.

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

भाजपच्या अंतर्गत पाहणीतही महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या कामचुकारपणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ईडी सरकारच्या गोंधळी कारभाराने प्रशासन ठप्प झाले आहे त्यामुळेच कल्याणकारी राज्याची संकल्पना केवळ कागदावरच आहे, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला साफ नाकारले गेले आहे परंतु भाजप महाराष्ट्राप्रमाणेच पक्षांतरासारखे अन्यायकारक मार्ग वापरून पुन्हा सत्तेवर आला आहे, असा आरोप तपासे यांनी केला आहे.

दरम्यान, न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे जाहीर केला आहे.

उद्धव ठाकरेंचा जन्मदिवस ‘देशद्रोही दिवस’ म्हणून घोषित करा, नितेश राणेंची यूनोकडे मागणी

या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजप (BJP) पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा केला आहे. याआधीही काही संस्थांनी निवडणुकीचे सर्व्हे जाहीर केले आहेत. आता द न्यूज एरिनाचा सर्व्हे समोर आला आहे.

Tags

follow us