Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची गैरहजेरी सगळ्यांनाच खटकली.
अजित पवार का हजर राहिले नाहीत यावर स्वतः शरद पवार यांनी खुलासा केला. पत्रकार परिषदेला तरी सर्वच पत्रकार उपस्थित राहतात का, माझ्या निर्णयाची अजित पवार यांना माहिती देण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनीही मला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती, असे पवार म्हणाले.
पवारांचा राजीनामा मागे, लगेच अजितदादा लागले कामाला
त्यानंतर आता या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे पत्रकार परिषदेत अनुपस्थित होते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पाटील म्हणाले, सगळेच सर्व ठिकाणी असू शकत नाहीत. सकाळी त्यांची जबाबदारी होती, त्याप्रमाणे बैठकीत भाग घेतला. शरद पवारांच्या घरी जाऊन चर्चा केली. त्यानंतर सर्वजण निघून गेले होते.
मलाही पत्रकार परिषद होत आहे याची माहिती उशीरा मिळाली. त्यामुळे पत्रकार परिषदेला उशीरा आलो. पत्रकार परिषद शरद पवारांची होती. पक्षाचे अध्यक्ष असल्याने मी आलो, असे पाटील म्हणाले.
शरद पवारांच्या एका दगडात किती पक्षी घायाळ?; युवा ब्रिगेड जोमात