Maharashtra Politics : लवकरच शिंदे गटाला भगदाड पडणार; ठाकरेंच्या खासदाराचं वक्तव्य

Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी काल वेगळा निर्णय घेत त्यांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे मशाल चिन्ह ठेवले होते. त्यांच्या या टर्नमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्री सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळचे मानले जातात. असे […]

Untitled Design   2023 09 30T075736.565

Untitled Design 2023 09 30T075736.565

Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी काल वेगळा निर्णय घेत त्यांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे मशाल चिन्ह ठेवले होते. त्यांच्या या टर्नमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्री सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळचे मानले जातात. असे असतानाही त्यांच्या भावाने अशी खेळी खेळल्याने शिंदेंसाठी हा धक्काच मानला जात होता. अर्थात त्यांनी काही वेळाने त्यांनी तो डीपी काढून टाकला खरा परंतु, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे स्पष्टपणे बाहेर आले. यानंतर या सगळ्या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

राऊत म्हणाले, किरण सामंत यांच्यासारखे शिंदे गटातील अनेक जण मशाल चिन्ह हाती घेऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याच्या मानसिकतेत आहेत. येत्या काही महिन्यात शिंदे गटाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि राज्यात मोठं भगदाड पडणार आहे. भाजपा शिंदे गटाचं लवकरच विसर्जन करेल. हे माहिती असल्यानं अनेकांच्या हातात मशाल येईल.

Maharashtra Politics : CM शिंदेंना धक्का! मंंत्री सामंतांचा भाऊ ठाकरे गटाच्या वाटेवर ?

नेमकं काय घडलं होतं ?

किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला मशाल चिन्ह आणि त्याखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणारा फोटो ठेवला होता. किरण सामंत यांच्या मनात नेमकं काय चाललं, ते आता उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार का असे प्रश्न उपस्थित झाले होते. असे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामागे कारणही आहे. किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ लढण्यासाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या किरण सामंत यांनी धक्कातंत्राचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

भावाच्या करिअरचा विचार करून स्टेटस काढले

या प्रकारावर किरण सामंत यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी स्टेटस ठेवले होते. त्यामागे काही कारणे आहेत. यावर योग्य वेळी बोलेन. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मी ते स्टेटस मागे घेतले आहे. उदयच्या करिअरच्या दृष्टीकोनातूनही मी ते स्टेटस मागे घेतले. या स्टेटसवर जो भी होगा देखा जायेगा असं लिहीलं होते. सगळ्या गोष्टींना माझी तयारी होती, असे त्यांनी सांगितले.

Nitin Gadkari : ‘निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी अन् चहापाणी करणार नाही’; नितीन गडकरींचं मोठं विधान

Exit mobile version