Maharashtra Politics : ठाणे शहरात काल ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाणीच्या घटनेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह संबंधित महिला कार्यकर्त्याची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान हल्ला चढविला. महाराष्ट्राला अत्यंत फडतूस गृहमंत्री मिळाल्याची घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपातील नेत्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खेडबोल सुनावले आहेत.
विखे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, की ‘माणसाने सत्ता गेल्यानंतर इतकं वैफल्यग्रस्त होऊ नये. तुम्ही स्वतः अडीच वर्षे सत्तेत असताना दोन मंत्री जेलमध्ये गेले. पोलीस आयुक्त जेलमध्ये गेले. त्यामुळे ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना आधी स्वतः आत्मपरिक्षण करावे.’
गौतमीने सांगितले इंदुरीकर महाराजांना पैशाचे गणित, तीन लाख रुपये घेतले असते तर…
‘फडणवीस यांच्यावर टीका करून त्यांनी उरलीसुरली नितीमत्ताही घालवली आहे. त्यांना फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची सीमा पार केली गेली’, अशा शब्दांत मंत्री विखे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
बागेश्वर बाबावर कारवाई करा
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबांबावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विखे यांनी निषेध केला. ते म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध केलाच आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हायला पाहिजे. स्वतःच्या प्रसिद्धी करता हे भान विसरले आहेत. त्यांना शुद्धीवर आणण्याची आवश्यकता आहे
Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?
फडणवीसांनीही घेरले
काल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आले अन् खुर्चीसाठी विरोधकांची लाळ घोटत आहेत. तर मग खेर फडतूस कोण ? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. तसेच फडतूसचे उत्तर थयथयाट करणाऱ्यांनी आधी दिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला याचं उत्तर माहित आहे. ते बोलले त्यापेक्षा खालची भाषा मला वापरता येते पण मी नागपूरचा आहे. तसं बोलणार नाही. कारण माझे संस्कार नाहीत असे उत्तर त्यांनी दिले.