Sanjay Raut : कुछ तो गडबड है.. देवेंद्रजी? हे खरे आहे का? राऊतांच्या ट्विटने खळबळ!

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुगल कंपनीने गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. त्यानंतर […]

Sanjay Raut : राज्यातले 'सुलतान', 'डेप्युटी सुलतान' प्रचारात व्यस्त; राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : राज्यातले 'सुलतान', 'डेप्युटी सुलतान' प्रचारात व्यस्त; राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुगल कंपनीने गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना डिवचलं आहे.

पिचाई यांच्या या घोषणेवरून राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्रजी.. हे खरे आहे..? मोदीजी अमेरिकेला गेले.. तेथे एकमेव गुंतवणूक करार केला तो फक्त आपल्या गुजरातसाठी. महाराष्ट्राला काय मिळालं? मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी खरंच आहे ना? दया.. कुच्छ तो गडबड है.. असे ट्विट त्यांनी केले आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मोदींच्या भेटीत भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाचेही कौतुक केले. मोदी यांच्या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान भेटणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. गुगल भारताच्या डिजिटायजेशनच्या फंडात 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. तसेच आम्ही गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा करत आहोत, अशी माहिती पिचाई यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा सध्या विविध कारणांनी गाजत आहे. मणिपूरमध्ये तुफान हिंसाचार सुरू असताना मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. सोशल मीडियावरही विरोधक टीका करत आहेत.

Exit mobile version