बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज

पुणे : ‘नारायणराव राणे, (Narayan Rane) तुमचे आव्हान राष्ट्रवादीने (NCP) स्वीकारले आहे. आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजवून दाखवाच..’ असे आव्हानच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी (NCP Challenges Narayan Rane) दिले आहे. याबाबत काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. वाचा : Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे राहिले तरी […]

Rane Pawar3

Rane Pawar3

पुणे : ‘नारायणराव राणे, (Narayan Rane) तुमचे आव्हान राष्ट्रवादीने (NCP) स्वीकारले आहे. आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजवून दाखवाच..’ असे आव्हानच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी (NCP Challenges Narayan Rane) दिले आहे. याबाबत काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे.

वाचा : Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे राहिले तरी काय ? ; नारायण राणेंनी पुन्हा डिवचले

नारायण राणे यांचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारत आहे. तुम्ही बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजवून दाखवा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, युवक, महिला तुमचे बारामतीत स्वागत करण्यास उत्सुक असतील असे काकडे यांनी या व्हिडिओ क्लीपमध्ये म्हणत आहेत.

अजितदादा, तुमची पुण्यात येऊन वाजवीन; चिडलेल्या राणेंचा सज्जड इशारा

जित पवार हे ज्या प्रकारचे राजकारणी आहेत त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर दुसऱ्यांचे बारसे करायला त्यांनी जाऊ नये. त्यांनी माझ्या फंदात आजिबात पडू नये, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवीन अशा शब्दांत राणे यांनी अजित पवार सज्जड इशारा दिला होता. त्यावर आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसनेही राणेंन आव्हान दिले आहे.

राणे म्हणाले होते, की अजित दादांना बारामतीच्या बाहेर कितपत कळते हे मला माहिती नाही. ज्या प्रकारचे ते राजकारणी आहेत त्याबद्दल बोलू नये असे मला वाटते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून मी कोकणातून निवडणूक लढलो आणि सलग सहा वेळा निवडूनही आलो. त्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून बांद्रा मतदारंसघातूनही निवडणूक लढली होती. उमेदवार हा शेवटी उमेदवार असतो त्यात पुरुष काय किंवा महिला काय असा प्रश्न त्यांनी केला.

Exit mobile version