Download App

‘लोकं फेसबुक लाइव्ह करणाऱ्या माणसाला मदत करतील का?’ शिंदेंचा खोचक सवाल

Eknath Shinde News : गेले अडीच वर्ष हे महाविकास आघाडी सरकार घरी झोपलं होत. घरी बसलं होतं. आज आम्ही लोकांच्या दारी योजना घेऊन जातोय तर लोक कुणाच्या बाजूने उभे राहतील. घरात बसून फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणाऱ्या माणसाला मदत करतील की प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन लोकांच्या सुख दुःखात सामील होणाऱ्या सरकारला मदत करतील हा सरळ माझा सवाल आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपशी हातमिळवणी सरकार स्थापन केले. त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्हही त्यांच्याकडे गेले. तेव्हापासून ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते शिंदेंवर कडाडून टीका करतात. शिंदे गटाकडूनही त्याला तितक्याच आवेशात उत्तर दिले जाते.

तिथं उमेदवारापासूनच मारामारी, आम्हाला नो टेन्शन; मुख्यमंत्री बॅनरवर शिंदेचे पटोलेंना चिमटे

आजही मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या देशातील तसेच महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. आम्ही घरी बसून काम करणारे नाही. फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणारे नाही. आता विकासाची गाडी सुसाट धावत आहे. सगळे अडथळे काढून टाकले आहेत. शेतीचं नुकसान झालं तेव्हा मी बांधावर नाही तर थेट शेतावर गेलो. तिथल्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या.

त्यांना आनंद घेऊ द्या 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कल्याण येथे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागले होते. यावरही त्यांनी भाष्य केले. शिंदे म्हणाले, चांगलं आहे प्रत्यक्ष नाही तर बोर्डावर तर फोटो लागतो. त्यांच्यात चढाओढ लागली आहे. त्यांना आनंद घेऊ द्या. त्यांनी आधी पीएम का सीएम यासाठी एक उमेदवार तर निश्चित केला पाहिजे. उमेदवारापासूनच मारामारी आहे. त्यामुळे त्याची आम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही.

Tags

follow us