Download App

Letsupp Special : माझ्या एक फोनमुळे वसंतदादांची मंत्रिमंडळात एन्ट्री; शालिनीताईंनी सांगितला ‘तो’ खास किस्सा!

Shalinitai Patil : मी पहिल्यापासूनच काँग्रेसची कार्यकर्ती होते. 1957 मध्ये मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळेला मला काँग्रेसचे जिल्हा लोकल बोर्डाचे तिकीट मिळाले. मी निवडून आले. त्यानंतर 1962 मध्ये पहिली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. जिल्हा परिषदेचं सदस्यत्व आपोआप मिळालं. त्यानंतर लगेच 1972 ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकांचा निकाल आला. त्यावेळी वसंतराव नाईकच मुख्यमंत्री झाले. पण, जुन्या मंत्रिमंडळातील 9 जणांना कमी करायचे ठरले होते. मग हा गॅप कसा भरून काढायचा. मराठा समाजाचे नेतृत्व मागे पडू द्यायचे नव्हते, असे मुद्दे समोर आले. यातून मार्ग काढण्यासाठी मला थेट इंदिरा गांधी यांच्या परिवारातून फोन आला. त्यावेळी मी त्यांना वसंतदादांचे नाव सांगितले. त्यांनीही याला होकार दिला आणि वसंतदादांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाली, अशी आठवण दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी व माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी सांगितली.

कर्डिले यांनी डाव टाकला ! काँग्रेसच्या माजी खासदाराचा नातू भाजपमध्ये

लेट्सअप मराठीने शालिनीताई पाटील यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते रोखठोक व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या,  त्यावेळी वसंतदादा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यावेळी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात स्पर्धा होती. पण, वसंतदादा जसे राज्याच्या राजकारणात आले तशी स्पर्धा कमी झाली. त्यावेळी मी रात्रीचे फोन घ्यायचे. वसंतदादा आणि त्यांचे सहकारी जेवणासाठी बाहेर कुठे जाऊ नयेत यासाठी आमच्या घरूनच त्यांच्यासाठी जेवणाचा डबा दिला जात होता.

त्यावेळी फोन काय असायचे तर कुणाला जीप पाहिजे, कुणाला पैसे पाहिजेत तर कुणाला बॅनर पाहिजे. एखाद्या मोठ्या वक्त्याचं भाषण पाहिजे हे सगळं मी नियोजन मी करत असायचे. त्यानंतर दादासाहेब सकाळी नाश्ता करून ऑफिसला जायचे. त्यानंतर 1972 चा जो निकाल आला तो अतिशय मोठा आला. मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी वसंतराव नाईकच मुख्यमंत्री झाले. पण जुन्या मंत्रिमंडळातील नऊ जणांना कमी करायचे होते. मग हा गॅप कसा भरून काढायचा. मराठा समाजाचे नेतृत्व मागे पडू द्यायचे नव्हते, असा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यावेळी निवडणुकीत मी महत्वाची भूमिका बजावली होती. या बातम्या वरपर्यंत गेल्या होत्या. चांगले काम करतात अशी सगळ्यांची धारणा झाली होती. त्यानंतर मला थेट इंदिरा गांधी यांच्या परिवारातून फोन आला. आता काय करावे असे त्यांनी विचारले. त्यावर मी म्हटले जर एक नाव तुम्ही घेतले तर जुन्या लोकांना फार बरे वाटेल. या उणीवा भरून काढायच्या असतील तर तुम्ही वसंतदादांना मंत्रिमंडळात घ्या, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी माझं ऐकलं, असे पाटील म्हणाल्या.

मग त्यांना समजलं व्यायामाचं महत्व

मी वसंतदादांच्या जीवनात आले ती गोष्ट 1964 ची आहे. त्यावेळेला ते एकटे होते. एकटे असल्यामुळे घर नव्हतं. लोकांनाही हे माहिती होतं त्यामुळे लोक त्यांचं प्रेमानं स्वागत करायचे. जिथे असतील तिथेच जेवण करून घरी यायचे असे त्यांचे वाऱ्यावरचे जीवन होते. मी आल्यानंतर पहिल्यांदा आमचं मुंबईत घर झालं. त्यांच्या आणि माझ्या वयात खूप मोठं अंतर होतं. वय वाढतं असल्यानं पथ्यपाणी पाळण्याची गरज होती. पण त्यांना इतकं नियमात वागण्याची कधी सवय नव्हती.

एकदा आम्ही दिल्लील अण्णासाहेब शिंदे यांच्या घरी गेलो होता. तिथे फिरायला चांगली जागा होती. त्यांच्या तब्बेतीकरता त्यांनी थोडं फिरलं पाहिजे होतं. तर ते फिरायचा कंटाळा करायचे. एक दिवशी रात्री जेवलेच नाहीत. शिंदेंच्याच घरातल्या लोकांनी सांगितलं. मग त्यांना समजलं की आता आपल्यालाही व्यायाम करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात शिस्त आली. लोकांनाही ते भेटायला लागले.

 

Tags

follow us