Download App

‘दोनच पेपर दिले तर गुणपत्रिका नापासचीच येणार’ ; मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीला खोचक टोला

Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता भाजपा नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, ‘या निर्णयात धक्कादायक असं काहीच नाही. समजा परीक्षा देताना सहा पेपर द्यावे लागतात आपण त्यापैकी दोनच पेपर दिले तर गुणपत्रिका नापासचीच येणार आहे. त्यामुळे या निकालाला धक्कादायक कसं म्हणणार ?’  असा सवाल त्यांनी केला.

‘आपल्या देशात कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी जे निकष आहेत त्यात एखाद्या पक्षाने किती राज्यांमध्ये निवडणूक लढवावी. किती राज्यात किती टक्के मतं मिळवावीत याचे काही निकष आहेत. त्यावरूनच त्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की नाही हे ठरत असते. ही मतं घेतली नाही तर हा निर्णय धक्कादायक कसा काय ? पेपर न देता मेरिटची गुणपत्रिका येणार आहे का ? त्यामुळे या निर्णयात धक्कादायक काही नाही तो प्रक्रियेचा एक भाग आहे’, असे मुनगंटीवार म्हणाले.

 

Uddhav Thackeray : “मस्तीत बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी….” बाबरी पाडल्याचा मुद्यावरून ठाकरे संतापले

जयंत पाटील काय म्हणाले ?

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, ‘राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. परंतू आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. येत्या काळात काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो.’ असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

‘निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय देशातील इतर पक्षांबाबतही घेतला आहे. यात अनेक वर्ष जुना असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश आहे. या निर्णयावर मतमतांतरं आहेत, मात्र आता निर्णय झाला आहे.’ याशिवाय त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पैशांच्या उधळपट्टीला चाप ! ‘या’ निवडणुकीतही उमेदवारांची खर्च मर्यादा झाली फिक्स..

‘आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कायम राहील. महाराष्ट्रापुरता या चिन्हाला कोणताही धक्का लागेल, असं वाटतं नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही.’

Tags

follow us