Download App

आमचं तुमच्याकडे लक्ष आहे पण तुमचं आमच्याकडे लक्ष नाही; अजित पवारांच्या टोलेबाजीवर जयंत पाटील निशब्द

  • Written By: Last Updated:

Mahrashtra Monsoon Session : अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. आता अजित पवारांच्या जागेवर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी पाहिला मिळाली आहे. त्यात अजित पवार व जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका वाक्याने मात्र जयंत पाटील हे निशब्द झाल्याचे दिसून आले. (Mahrashtra Monsoon Session Jayant Patil is speechless on Ajit Pawar speak)

संग्राम थोपटेंचं विधानसभा अध्यक्षपद कोणी अडवलं होतं? काँग्रेसच्या बाकावरुन थेट अजितदादांकडे बोट

विरोधी पक्षनेते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांएेवजी विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात होणाऱ्या वर्णनाच्या भाषणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. त्याचवेळी अजित पवार यांनीही उभे राहून जयंत पाटलांना एक टोला लगावला आहे. आमच्या दोघांचे लक्ष तुमच्याकडे आहे. पण तुमचेच नाही तर आम्ही काय करू, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर मात्र सभागृहात जोरदार हास्यकल्लोळ झाला. त्यावर जयंत पाटील हेही थोडे असले. पण पुढील बोलताना मात्र तो निशब्द झाले.


‘शिंदे, मी, अजितदादा, भुजबळ अन् विखे पाटील…’; पाच नेत्यांचा संदर्भ देत फडणवीसांच्या वडेट्टीवारांना शुभेच्छा!

अजित पवारांच्या फटकेबाजीनंतर थोडे थांबून जयंत पाटलांनाही अजित पवार व देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक टोल लगावला. मुख्यमंत्री विचलित न होता सर्वांचे भाषणे एेकतात. दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पहिले नंबरचे उपमुख्यमंत्री कोण आणि दुसऱ्या नंबरचे उपमुख्यमंत्री कोण ठरवावे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी फुटीपूर्वी अजित पवार व जयंत पाटील यांच्यामध्ये वाद असल्याचे समोर आले होते. अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छूक होते.

follow us