Download App

Balasaheb Thorat : मविआतील जागा वाटप ठरेना; पण थोरातांनी किती जागा जिंकू हेच सांगून टाकले

  • Written By: Last Updated:

Balasaheb Thorat : कर्नाटक काँग्रेसने जिंकल्यानंतर महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यात वज्रमूठ सभाही पुन्हा होणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी मविआच्या नेत्यांची मुंबईत जागा वाटपांबाबत महत्त्वाची बैठक झाली आहे. त्यानंतर जागा वाटपांबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मविआतील तिन्ही पक्ष हे प्रत्येकी १६ लोकसभेच्या जागा लढतील, असा एक फॉर्मुला चर्चेत आला होता. लोकसभेच्या जागा वाटपांबाबत काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे स्पष्ट बोलले आहेत. तर महाविकास आघाडी किती जागा जिंकले हेही थोरातांनी सांगून टाकले आहे.

सुषमाताईंची…, अंधारे-जाधव वादावर आमदार नितेश राणेंचा मार्मिक टोला…

थोरात म्हणाले, आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसलो होतो. आमची जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती. पण जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. पण महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा निवडून येतील, असा विश्वासही थोरात यांनी बोलून दाखविला आहे.

जागा वाटप झाले नसले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी लागला आहे. पण महाविकास आघाडीत जागावाटपावरुन गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. जागा वाटप होण्यापूर्वीच ठाकरे गटाने आम्ही आमच्या १९ जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहेत. त्यावर राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी माध्यमांसमोर नाराजीही व्यक्त केलेली आहे.

काँग्रेस हायकमांड जागावाटपावर पुढचे सूत्र ठरवेल, असेही काँग्रेसचे काही नेते सांगत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटप सहजासहजी होणार नाही, असे नेत्यांच्या विधानावरून दिसून येत आहे.

Tags

follow us