‘Prakash Mahajan यांना वधू-वर सूचक मंडळाचे संचालक करा’, Sushma Andhare यांचा खोचक टोला

ठाकरे गटाच्या ( Thackeray Camp )  नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तसेच शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाची काल अंधेरीमध्ये सभा होती. अंधेरी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (96)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (96)

ठाकरे गटाच्या ( Thackeray Camp )  नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तसेच शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाची काल अंधेरीमध्ये सभा होती. अंधेरी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan ) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मनसेचे नेते आदित्य ठाकरे यांचे वय 32 झाले तरी लग्न का होत नाही, असे  प्रश्न विचारतात.  मनसे पक्ष हा इतका बंद पडायला आलाय का?  की आता वधू-वर सूचक मंडळ काढले आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. आम्ही वधू-वर सूचक मंडळ काढले आहे, हे एकदा जाहीर करुन टाका व त्याचे संचालक प्रकाश महाजन यांना करा, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

(Kasba Bypoll Election : भाजपा उमेदवार रासनेंनंतर मविआचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल)

तसेच त्यांनी भाजप नेते आशिष शेलार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शेलारांनी फेब्रुवारी 2022 मध्ये शिंदेविरोधात भ्रष्टाचाराचे एक प्रकरण बाहेर काढले होते. ते आता त्यांनी गुंडाळून ठेवले आहे. शिंदे गटात सामील झालेल्या प्रत्येक नेत्यावरील केसेस आता बंद झाल्या आहेत. किरीट सोमय्या आता काय करत आहेत, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला.

दरम्यान मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी देखील एका सभेत सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे प्रकाश महाजन व सुषमा अंधारे हे दोन्ही नेते मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे आगामी काळात ते एकमेकांवर आणखी टीका करु शकतात.

Exit mobile version