Download App

Manoj Jarange Patil : एकाच तासात आरक्षण मिळू शकतं फक्त.. जरांगेंनी सांगितलं नेमकं गणित

Image Credit: letsupp

Manoj Jarange patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यानंतर पुढील रणनीती काय असणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने मार्ग काढावा अशी मागणी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकत्रित बसून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा, अशीही मागणी त्यांनी केली.

Uddhav Thackeray : ‘मिंध्यांनी पक्षांतर अन् ढोंगांतरही केलं, शिंदेंचं हिंदुत्व बेगडी’; ठाकरे गटाचा घणाघात

आरक्षणासाठी दिलेली मुदत संपण्याला आता सात दिवसांचा अवधी राहिला आहे. या काळात सरकारकडून कुणाचा काही संपर्क झाला का, असे विचारले असता जरांगे म्हणाले, सरकारकडून आम्हाला अजून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. कदाचित ते कामात असतील. आम्हाला काही गरजही नाही. आम्ही काही त्यांच्यावर नाराज नाही. सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला आहे. मंत्री सांदिपान भुमरे यांनी वैयक्तिक फोन केला होता. बाकी परत कुणाचा फोन वगैरे काही आलेला नाही.

सात दिवसांची मुदत राहिली म्हणता पण, सात दिवसच कशाला फक्त एकाच तासात मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. कारण सगळे पुरावे समितीकडे आहेत. त्यामुळे आता आरक्षण देण्याची इच्छाशक्ती असेल तर काहीच वेळ लागणार नाही. एक तासही लागणार नाही निर्णय घ्यायला. दसऱ्याला सरकार आरक्षणाचं सिमोल्लंघन करेल असे मलाही वाटते. आमच्याबरोबर करोडो लोक आले आहेत. त्यामुळे आता सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनीही या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे आहे. तीन चार लोकांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे ही माझी विनंती आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.  

Sujay Vikhe Patil; भिंगार छावणीचा सहा महिन्यात महापालिकेत होणार समावेश

मुदत संपल्यानंतर सरकारला 15 मिनिटेही देणार नाही 

मराठा आरक्षणासाठी सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. आम्ही त्यावर दहा दिवस वाढवून दिले आहे. 24 ऑक्टोबरला ही मुदत संपणार आहे. त्यानंतर मात्र सरकारला 15 मिनिटेही देणार नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत सरकारने दिलेल शब्द पाळावा. 24 ऑक्टोबर रोजी मुदत संपत आहे. त्याआधी 22 ऑक्टोबर रोजी मराठा समाजाची बैठक होणार असून या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us

वेब स्टोरीज