ऑडिओ क्लिपनंतर जरांगेंनी घेतला मोठा निर्णय; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन

Manoj Jarange’s decision after the audio clip controversy: राज्यात कट्टर मराठा सेवकांची फळी उभी करणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं.

Manoj Jarange’s decision after the audio clip controversy

Manoj Jarange’s decision after the audio clip controversy

Manoj Jarange’s decision after the audio clip controversy: ऑडिओ क्लिपच्या प्रकरणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता संघटना मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक विभागात कट्टर मराठा सेवकांची फळी उभी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यासाठी मराठा सेवकांना एक व्हॉट्सॲप नंबरही दिला जाणार आहे. आंदोलन काही दिवस उशिरा झालं तरी चालेल, पण आधी मराठा सेवकांची मजबूत फळी तयार करणार, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

सेबीची अवधूत साठेवर कठोर कारवाई; 546 कोटी परत करण्याचे आदेश!

ऑडिओ क्लिपच्या प्रकरणातून मी खूप शहाणा झालो, असे जरांगे म्हणाले. तसेच मराठा समाजानेही आता सावध राहण्याची गरज असल्याचं जरांगे म्हणाले. सध्या कोण कोणासोबत आहे, कोण समाजापासून दूर गेलं आहे, हे समजणं कठीण झालं आहे. त्यामुळे समाजातील कट्टर आणि विश्वासू कार्यकर्त्यांना एकत्र आणून राज्यभर मजबूत संघटन उभं करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘आरक्षण मागितलं, तर आमच्यासमोर अडचणी उभ्या केल्या’

मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढत असताना आमच्याविरोधात अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या, असा आरोप जरांगे यांनी केला. आम्ही आरक्षणाची मागणी केली, तर आमच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे डाव आखण्यात आले. पडद्यामागे काय नियोजन सुरू होतं, हे आता समोर आणलं आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाजाची मजबूत फळी तयार करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

अहिल्यानगर हादरले ! 35 वर्षीय महिलेवर गोळीबार करून तरुणाने गोळी झाडून जीवन संपविले

‘सरळ माणसाला जगणं अवघड झालंय’

महायुतीतील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले असतील, तर तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, मराठा समाजाच्या आंदोलनाला चिरडण्यासाठी षडयंत्र का रचण्यात आलं, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. आजही समाजावर आरोप केले जात आहेत. पडद्यामागे नेमकं काय सुरू होतं, हे मी राज्याला दाखवून दिलं आहे, असंही त्यांनी म्हटलं.

या जगात सरळपणे वागणाऱ्या माणसाला जगणं कठीण झालं आहे. गरीब कुटुंबातील मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला. त्यामुळे मराठा समाजाने आपलं कोण आणि परकं कोण, हे ओळखण्याची गरज आहे, असं आवाहन त्यांनी केलं.

दोन-तीन दिवसांत कामाला सुरुवात

मराठा सेवकांची नवीन फळी तयार करण्याचं काम येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. आधी कार्यकर्त्यांची मजबूत यंत्रणा उभी केली जाईल आणि त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. आंदोलन चार दिवस उशिरा झालं तरी चालेल, पण संघटन मजबूत करणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रभासच्या वाढदिवशी ‘फौजी’चे जबरदस्त पोस्टर रिलीज, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली !

ऑडिओ क्लिपच्या प्रकरणानंतर मराठा समाजाने अधिक सतर्क राहावं आणि संघटित व्हावं, असं आवाहन करत जरांगे यांनी आगामी काळात राज्यभरात मराठा सेवकांची फळी उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Exit mobile version