Download App

खाजगी विनोद झाला त्यामुळे तटकरेंची गळाभेट! जयंत पाटलांनी दोन तासांतच दिला चर्चांना पूर्णविराम…

Mansoon Session : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, सर्वच लोकांशी वैयक्तिक संबंध असतात, त्यामुळे गळाभेटीचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर दोन्ही नेते आता आमने-सामने आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे जयंतराव आणि सुनील तटकरे यांनी अधिवेशनात गळाभेट घेतली. या गळाभेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उघाण आलं होतं. त्यावरुन आता जयंत पाटलांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.

कर्डिले यांनी डाव टाकला ! काँग्रेसच्या माजी खासदाराचा नातू भाजपमध्ये

जयंत पाटील म्हणाले, आता सुनिल तटकरे आणि मी वेगवेगळ्या पक्षात आहे. अनेकांचे व्यक्तीगत संबंध असतात. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं. त्यामुळे याचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच सभागृहात अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. तसेच सुनिल तटकरेही भेटले. त्यांच्यासोबत खाजगी स्वरुपाचा विनोद झाला त्यामुळेच गळाभेट झाल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

माझे अनेकांसी संबंध आहेत, त्यामुळे राजकारणाची काही दिशा बदलली असं काही नाही. खाजगी प्रसंगाची चर्चा झाल्याने त्या ठिकाणी विनोद झाला पण मी पवारांसोबत असल्याने आम्हाल जे सोडून गेले त्यांच्याशी ‘मन की बात’ करीत नाहीत. आता दुपारीच अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांसोबत आम्ही जेवण केलं, राजकारण आणि व्यक्तिगत स्तरावर वेगळे संबंध असल्याचं जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा उफाळून आल्या होत्या. मी शरद पवारांसोबत ठामपणे असल्याचंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच सभागृहात असं चोरुन फोटो काढणारी व्यवस्था बंद झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us