Download App

Video : धसांकडून मोहीम फत्ते; जरांगेंची उपोषण स्थगितीची घोषणा; पण, आता लढाई समोरा-समोर…

Maratha Reservation Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. आज अंतरवाली सराटीत त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हे मूळ दुखणं आहे. तीन-चार कामं करतो म्हणालेत. 2004 चा कायदा दुरूस्त (Maratha Reservation) करा. राज्यातला सरसकट मराठा कुणबी आहे. या चार – पाच मागण्या आजही मंजूर करायला तयार आहेत, मात्र सग्या सोयऱ्यांसाठी काही हरकती आल्या आहेत, त्यासाठी महिन्याचा कालावधी लागेल, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. आज मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केलंय.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तेथे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) देखील उपस्थित आहेत. शिंदे समितीच्या नोंदी सापडल्यात, अंमलबजावणी कधी करणार असा सवाल मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांना विचारला आहे. यावेळी मनोज जरांगे यांचं संपूर्ण शरीर थरथर कापत आहे. त्यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलंय. काल रात्री त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं.

अजित पवार करणार मोठी घोषणा, लाडक्या बहि‍णींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पांचाळ शासनाचं लेखी प्रमाणपत्र आंदोलनस्थळी घेवून आले होते. त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केलीय. उपोषणाच्या आठ मागण्या शासनाकडे केल्या होत्या. त्यापैकी मुख्यमंत्री फडणवीसांनी चार मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली. जीडीपीकडून चार मागण्यांसाठी मान्यता देण्यात आलंय. शिंदे समितीची मागणीबाबत सकारात्मकता आहे.

बेईमानी…शिंदे समिती बरखास्त, नुसते खलबतं सुरू; जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरू आहे, गॅझेट संदर्भातील मागणी, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई घेण्यात येईल, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत काम सुरू राहील आणि त्याला गती देण्यात येईल, असं आश्वासन राज्य शासन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय. यासोबत मागण्यांची दखल घेतल्यामुळं सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घ्यावं, अशी विनंती करण्यात आली.

ईडब्लुएसच्या माध्यमातून अॅडमिशन झालेले तसेच ठेवावे, काही मराठ्यांच्या तरूणांच्या आत्महत्या झाली, त्यांना 10 लाखांची मदत मिळालेली नाही, ते देण्यात यावी. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्हाला हवीच आहे. जर नाही झालं तर तारीख डिक्लेअर करू, मुंबईकडे निघू असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय. यावेळी दोन कोटी मराठे दिसणार. पोलिसांनी हाणलं तर मंत्री अन् त्यांची पोर धरायची, असं देखील मनोज जरांगे म्हणालेत. आपण हे आंदोलन स्थगित करतोय, बंद करीत नाही असं देखील मनोज जरांगे म्हणाले. यापुढे उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार.

follow us