Marathi hand behind bringing ‘NDA’ government again! How did Vinod Tawde capture Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून महायुतीला (NDA) मोठ यश मिळालं असून महागठबंधनचा सुपडासाफ झाला आहे. सुमारे 202 जांगाचं बंपर बहुमत भाजप जदयु महायुतीला मिळालं. त्यामुळे आता एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा बघायला मिळाला आहे. मात्र भाजप आणि एनडीएच्या या विजयामागे एक मराठी चेहरा आहे. ज्यांनी हे सर्व घडवून आणलं ते नाव म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे.
भाजप आणि एनडीएच्याविजयामागचा मराठी चेहरा…
बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांना पहिल्यांदाच न भूतो ना भविष्यती असं बहुमत मिळालं आहे. यासाठी अनेकांनी मेहनत घेतली पण त्यात मराठी आणि भाजप नेते विनोद तावडे यांचं विशेष स्थान आहे. कारण बिहारमध्ये गुंतागुंतीचं राजकीय समीकरण आहे. बिहारमधील तब्बल 65 मतदारसंघ हे भाजपला जिंकण कठिण होत. पण त्याच ठिकाणी तावडेंनी राजकीय आणि जातीय समीकरणं जूळवत भाजप आणि जेडीयू यांना अविश्वसनीय यश मिळवून दिलं.
दुसरीकडे बिहामध्ये 35 जागांवर यादव आणि मुस्लीम समाजाचा प्रभाव होता. तर 30 जागांवर दलितांचा या 65 जागा जिंकण्यासाठी भाजप आणि जेडीयू यांनी यादव , मुस्लीम आणि दलितांना सोबतच ठेवंल. भाजपने नितीशकुमारांसोबतची युती टीकवली. चिराग पासवानांना बरोबर घेतलं. हे सगळं घडवून आणलं ते विनोद तावडे यांनी त्यामुळे या 65 पैकी 30 जागा त्यांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे या यशाचं श्रेय हे तावडेंना जात.
बिहारचा गड जिंकण्यासाठी तावडे आणि टीम 2022 पासून रणनीती आखून होते. याच काळात नितीस कुमारांनी भाजपची साथ सोडून कॉंग्रेस आणि राजदसोबत सरकार स्थापन केलं होतं. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रभारी म्हणून तावडे यांनी काम सुरू केलं. राजकीय समीकरणं जुळवण्याच्या त्यांच्या हातोटीद्वारे त्यांनी नितीशकुमारांना पुन्हा जवळ केलं. यासाठी त्यांनी कॉंग्रेस आणि राजदसोबत गेलेल्या नितीश कुमारांशी संपर्क कायम ठेवला. त्यात तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांमधील धुसफूस वाढली आणि भाजपनं संधी साधली. त्यासाठी त्यांनी सत्ता समीकरण आणि जागावाटप यावर वाटाघाटी केली. त्यानंतर नितीशकुमारसोबत आले अन् बिहारमध्ये एनडीए मजबूत झाली.
मराठीशी नाळ जोडलेला कन्नड अभिनेता ‘आफ्टर ओएलसी’ मध्ये, डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल
त्यानंतर त्यांनी एकमेकांचे वैरी असलेल्या नितीशकुमार आणि पासवानांना राजकीय नाइलाजाचं कारण देत एकत्र आणलं. त्याचंच फळ आता बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून महायुतीला (NDA) मोठ यश मिळालं. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यावर स्वत: विनोद तावडे म्हणाले की, गेल्या वेळी देखील भाजपच्या जागा जास्त होत्या. भाजप 75 आणि जेडीयू 45 होत्या. तरी देखील आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं होतं. यावेळी देखील यावर केंद्राचे पाचही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील.
