LetsUpp Special : सरपंचपदापासून ते भाजपमध्ये (BJP) वेगवेगळ्या पदांवर मोठी उडी मारणारा, राज्यमंत्रिपद भूषविणारा मराठवाड्यातील एक बडा नेता सध्या गायब आहे. हा नेता 13 नोव्हेंबरपासून नॉट रिचेबल आहे. हा नेता जनमाणसांमधील असून, रोज कुठून कुठे कार्यक्रम, राजकीय भेटी, अशा राजकीय बाबी असताना हा नेता सध्या जनतेला भेटत नाही. जनतेला त्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील हा नेता आहे कुठे अशी चर्चा सुरू झालीय आहे.
सारा गुरपालचा धक्कादायक खुलासा! लग्नानंतर 47 दिवस घरात डांबून ठेवलं, पतीकडून शारीरिक छळ
सोशल मीडियावर रोजचे अपडेट पण
या नेत्याचे सोशल मीडिया अकाउंट रोजच्या रोज अपडेट होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाजपच्या प्रमुख कार्यक्रमाचे मेसेज या नेत्याच्या सोशल मीडियावर पोस्ट होतात. विविध नेत्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र या नेताचा सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीचा सोशल मीडियावरील फोटो 8 नोव्हेंबरचा आहे. त्यानंतर या नेत्याची स्वत:ची उपस्थिती सोशल मीडियावर दिसलेली नाही. या नेत्याचे शेवटचे व्हॉटसअॅप सीन 13 नोव्हेंबरचे आहे. त्यावरूनही व्हॉटसअपही त्या नेत्याने पाहिलेले नाही, असे दिसून येत आहे. हा नेता परदेशात गेल्यानंतरही तिथेल फोटो सोशल मीडियावर टाकत असतो. व्हॉटसअपही वापरत असतो. त्यामुळे हा नेता सध्या विजनवासात असल्याची चर्चा आहे. रोज जिल्ह्यात, गावात मराठवाड्यात संपर्क असलेला हा नेता आहे. जनसंघाचा स्थापनेपासून पक्षासोबत असलेला हा नेता सध्या नाराज आहे का अशी चर्चा सुरू आहे.
निवडणूक हरल्यानंतर बांधणी, दिवाळीत खास कार्यक्रम
2024 ची निवडणूक हरल्यानंतर या नेत्याने पुन्हा जोरदार राजकीय बांधणी सुरू केली होती. आपल्या पक्षातील व विरोधी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटीचा कार्यक्रम सुरू केला होता. तर दिवाळीत विरोधकांच्या गाठीभेटी घेत शुभेच्छा दिल्या होत्या. दिवाळी निमित्त वृत्तवाहिन्यांवर खास कार्यक्रम या नेत्याने केला होता. त्यानंतर अचानक हा नेता गायब झाल्याने उलटसूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
या नेत्याची मुले राजकारणात स्थिरस्थावर झालेली आहेत. जमीन प्रकरणाचे झेंगट या नेत्यामागे लागले आहे की नॉट रिचेबल होण्यामागे दुसरे काही कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु या नेत्याचे अचानक गायब होण्याच्या वेगवेगळ्या चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये व इतर राजकीय नेत्यांमध्ये सुरू झालेल्या आहेत.
